कीव (युक्रेन) – रशिया-युक्रेन युद्धाच्या १६ व्या दिवशी रशियाने युक्रेनवर क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा केला. यासह रशियाने युक्रेनची राजधानी असलेल्या कीवला दोन्ही बाजूंनी वेढा दिला आहे. त्याच वेळी रशियन सैन्य उत्तरेकडील इरपिन आणि पूर्वेकडील ब्रोवरी येथेही सतत आक्रमणे करत आहे. युक्रेनने ब्रोवरीमध्ये रशियाला चोख प्रत्युत्तर देतांना रशियाचे ५ रणगाडे उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. रशिया युक्रेनवर रणगाडे, ‘पॅराट्रूपर्स’, पायदळ, ‘अँटी-टँक गाईडेड मिसाईल्स’ आदी शस्त्रांद्वारे आक्रमण करत आहे.
Satellite Image: युक्रेनवरचा धोका वाढला, रशियाकडून कीववर मिसाईलचा पाऊसhttps://t.co/ljRF39vcbL
— News18Lokmat (@News18lokmat) March 11, 2022