अल्लाची क्षमा न मागितल्यास पंथातून बहिष्कृत करण्याची धमकी
|
सहारणपूर (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेमध्ये ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणारे अहसान (वय २२ वर्षे) यांच्यावर मुसलमानांकडून सामाजिक बहिष्कार घालण्यात आला आहे. त्यांच्या नातेवाइकांनीही त्यांच्याशी फारकत घेतली आहे. तसेच अहसान यांना धमकीचे दूरभाष येत असून ‘अहसान आता ‘मुसलमानेतर’ झाला आहे’, असे सांगण्यात येत आहे. योगी आदित्यनाथ यांची ही सभा २ डिसेंबर २०२१ या दिवशी झाली होती. या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही उपस्थित होते. अहसान यांना येणार्या धमक्यांमुळे त्यांना सशस्त्र पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.
Uttar Pradesh: Muslim youth chants Jai Shri Ram, Bharat Mata Ki Jai in a rally, Deoband maulanas threaten to expel him from Islamhttps://t.co/nkPamw0tGO
— OpIndia.com (@OpIndia_com) December 6, 2021
१. अहसान यांनी म्हटले की, मला घोषणा देण्याचा कोणताही पश्चात्ताप नाही. भगवान श्रीराम आमचे पूर्वज आहेत आणि आम्ही त्यांचे वंशज आहोत.
२. देवबंद येथील मुफ्ती (शरीयत कायद्याचे जाणकार, विद्वान) असद कासमी यांनी म्हटले होते की, इस्लाममध्ये अशा प्रकारच्या घोषणा देण्याची अनुमतीच नाही. अहसान यांनी मौलांनाना भेटून अल्लाची क्षमा मागितली पाहिजे. अन्यथा अहसान यांना इस्लाममधून बहिष्कृत करण्यात येईल.