राधानगरी (जिल्हा कोल्हापूर), २ जानेवारी (वार्ता.) – धर्मनिरपेक्ष भारतात धर्मावर आधारित चालणारी ‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था तात्काळ बंद करण्याविषयी आणि असे प्रमाणपत्र देणार्या सर्व संस्थांची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन राधानगरी (जिल्हा कोल्हापूर) येथे नायब तहसीलदार अतुल काकडे यांना ‘मानव सुरक्षा सेवा संस्थे’च्या वतीने नुकतेच देण्यात आले. या वेळी ‘मानव सुरक्षा सेवा संस्थे’चे संस्थापक अध्यक्ष श्री. बाजीराव मारुति मोरे आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री. प्रवीण पाटील उपस्थित होते. (‘हलाल प्रमाणपत्र’ व्यवस्था बंद करण्यासाठी निवेदन देणार्या ‘मानव सुरक्षा सेवा संस्थे’चे अध्यक्ष श्री. बाजीराव मारुति मोरे आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री. प्रवीण पाटील यांचे अभिनंदन ! इतरच्या राष्ट्रप्रेमींनी या प्रकारे ‘हलाल प्रमाणपत्र’ बंद होण्यासाठी शासनाला निवेदन देण्यासाठी पुढाकार घ्यावा ! – संपादक)