
कोगनोळी (कर्नाटक), २ जानेवारी (वार्ता.) – मत्तीवडे येथे २० लाख रुपये व्यय करून बांधलेल्या महादेव मंदिर, गणेश मंदिर यांचा कळसारोहण, तसेच मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा नुकताच पार पडला. या वेळी चिंचणी मठाचे अल्लमप्रभू स्वामी, निपाणी समाधी मठाचे पू. प्राणलिंग स्वामीजी, मुरगेंद्र मठाचे मल्लिकार्जुन स्वामी, रासाई शेंडूरच्या ओम शिवशक्ती मठाचे वरुणानंद स्वामी, आडी सिद्धेश्वर मठाचे सिद्धेश्वर स्वामी यांसह मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री. शिवगोंडा पाटील उपस्थित होते.
सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन !

कळसारोहण सोहळ्याच्या निमित्ताने मत्तीवडे येथे २ दिवस सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते, तसेच धर्मशिक्षण विषयक माहिती देणार्या फलकांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते. याला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
परभणी येथील संत कालिदास महाराज यांचे देहावसान
५ जणांना कापूरबावडी पोलिसांकडून समजपत्र !
नाशिकच्या जलसंवर्धन योजनेची राष्ट्रीय स्तरावर नोंद !
ठाणे येथे २५ वर्षांपासून गढूळ पाण्याचा पुरवठा; संतप्त नागरिकांचा महानगरपालिकेवर मोर्चा