सरकारी निवृत्ती वेतनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या मुदतीत २८ फेब्रुवारीपर्यंत वाढ

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – सरकारी निवृत्ती वेतनधारकांसाठी वार्षिक जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. यापूर्वीची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२१ होती. निवृत्तीवेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाकडून याची माहिती देण्यात आली आहे. वाढीव कालावधीत निवृत्तीवेतन बँक खात्यात जमा होणार आहे.