कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्‍वभूमीवर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा केंद्र सरकारचा राज्य सरकारांना सल्ला

प्रातिनिधिक छायाचित्र

नवी देहली – देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर कोरोनाच्या प्रसाराचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारने १ जानेवारी या दिवशी राज्यांसाठी एक मार्गदर्शिका जारी केली. यामध्ये राज्यांना तात्पुरती रुग्णालये उभारण्याची प्रक्रिया चालू करणे आणि या प्रकरणांवर देखरेख ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करणे आणि कोरोनाविषयीच्या आरोग्य स्तरावरील मूलभूत सुविधांची समीक्षा करण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.