इतरांना साहाय्‍य करण्‍यास तत्‍पर असलेले चि. अक्षय पाटील आणि परेच्‍छेने वागून इतरांना आनंद देणार्‍या चि.सौ.कां. वैष्‍णवी जाधव !

१.१२.२०२१ या दिवशी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात पूर्णवेळ सेवा करणारे चि. अक्षय पाटील आणि चि.सौ.कां. वैष्णवी जाधव यांचा शुभविवाह आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये ……

कोल्हापूर येथील आधुनिक वैद्य (डॉ.) शशिकांत भूपाल शेंडे यांनी संधीवात आणि ‘कोरोना’ यांमुळे आजारी असतांना अनुभवलेली गुरुकृपा !

आधुनिक वैद्य (डॉ.) शशिकांत भूपाल शेंडे यांनी अनुभवलेली गुरुकृपा पुढे दिली आहेत.

आसाममध्ये धर्मांतरित ख्रिस्त्यांनी हिंदूंच्या प्राचीन धार्मिक स्थळावरील शिवलिंग आणि त्रिशूळ उपटले !

धर्मांतरित ख्रिस्त्यांचा उद्दामपणा जाणा ! आज शिवलिंग आणि त्रिशूळ उपटणार्‍या अशा हिंसक प्रवृत्ती उद्या हिंदूंची मंदिरेही पाडायला पुढे-मागे पहणार नाहीत, हे लक्षात घ्या आणि असे होऊ न देण्यासाठी संघटित व्हा !

बेंगळुरू येथील ५० वर्षे जुने श्री चामुंडेश्‍वरी देवस्थान अनधिकृत ठरवून पाडण्याचा रेल्वे अधिकार्‍यांचा प्रयत्न संघटित हिंदूंनी हाणून पाडला !

हिंदू संघटित झाल्यास काय होऊ शकते, याचे हे आणखी एक उदाहरण ! हिंदूंची मंदिरे अनधिकृत ठरवून पाडण्याचा प्रयत्न करणार्‍या रेल्वे अधिकार्‍यांवर कारवाई करा !

बिहार विधानसभेच्या आवारात सापडल्या दारूच्या रिकाम्या बाटल्या !

विधानसभेच्या परिसरात कडक सुरक्षाव्यवस्था असतांना तेथे दारूच्या रिकामी बाटल्या सापडतातच कशा ? कुंपणच शेत खात असेल, तर याची कसून चौकशी करून संबंधितांना शिक्षा झाली पाहिजे.

भारतात ‘हलाल प्रमाणपत्रा’द्वारे समांतर अर्थव्यवस्था करण्याचा प्रयत्न होणे गंभीर !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात व्यापारी, उद्योजक, धर्मप्रेमी आदींनी व्यक्त केले मत हिंदु जनजागृती समितीचे मनोज खाडये यांच्या ‘सिंधुदुर्ग जनसंपर्क अभियाना’त हलाल प्रमाणपत्राच्या दुष्परिणामांविषयी प्रबोधन आपापल्या स्तरावर प्रबोधन करण्याचा धर्मप्रेमींचा निर्धार सिंधुदुर्ग – हिंदूंचा व्यापार आणि अर्थव्यवस्था यांत हस्तक्षेप करून समांतर अर्थव्यवस्था निर्माण करण्याचे ‘हलाल प्रमाणपत्र’ हे जागतिक षड्यंत्र आहे. या ‘हलाल प्रमाणपत्रा’विषयी जिल्ह्यात कुडाळ, मालवण, देवगड, कणकवली, … Read more

५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणार्‍याला फाशीची शिक्षा !

अशा गुन्हेगारांना हीच शिक्षा योग्य ! या शिक्षेची तात्काळ कार्यवाही होणेही तितकेच आवश्यक !

देशात कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ प्रकारचा एकही रुग्ण नाही ! – केंद्रीय आरोग्यमंत्री

देशात आतापर्यंत कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ प्रकारचा एकही रुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी संसदेत दिली. कोरोनाचा हा नवा विषाणू सर्वांत प्रथम दक्षिण अफ्रिकेत आढळला आहे.

‘श्रीशैलम् भ्रमराम्बिका मल्लिकार्जुन स्वामी मंदिरा’च्या परिसरात अन्य धर्मियांना दुकाने लावता येणार नाहीत !

हिंदु जनजागृती समितीचे श्री. चेतन गाडी म्हणाले की, श्रीशैलम् हे तीर्थक्षेत्र १८ शक्तिपिठांपैकी एक आणि १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. इतक्या पवित्र तीर्थक्षेत्री अन्य धर्मियांचा प्रभाव असणे, ही अतिशय दु:खद गोष्ट आहे.

उत्तराखंड सरकारकडून अखेर चारधामसह ५१ मंदिरांचे सरकारीकरण रहित !

आता संपूर्ण देशातील सरकारीकरण झालेल्या मंदिरांच्या विरोधात संपूर्ण देशातील पुजारी, धार्मिक संघटना आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी एकत्र येऊन आंदोलन केले पाहिजे अन् देशातील प्रत्येक मंदिर सरकारीकरणमुक्त केले पाहिजे !