कसई येथील श्री सातेरीदेवी मंदिर परिसरातील अन्य धर्मियाचा कक्ष काढायला हिंदुत्वनिष्ठांनी भाग पाडले

कक्ष काढतांना संबंधित युवक

दोडामार्ग – कसई येथील श्री सातेरीदेवी मंदिर परिसरात एका मुसलमानाने ‘न्यू देहली स्पेशल गोबी मंच्युरियन’, असा फलक लावून खाद्यपदार्थाचा कक्ष (स्टॉल) चालू केल्याचे समजल्यानंतर येथील जागृत हिंदूंनी संघटित होऊन कक्ष हटवण्यास भाग पाडले. या वेळी ‘प्रत्येकाने आपल्या भागातील जत्रा, उत्सव आणि धार्मिक कार्यक्रम यांच्या वेळी आपले संत, महंत, तसेच भारतमाता यांना न मानणारे अन्य धर्मीय लोक दुकाने लावत असतील, तर त्यांच्या दुकानांना विरोध करावा’, असे आवाहन करण्यात आले.

येथील श्री सातेरी मंदिर परिसरात ‘न्यू देहली स्पेशल गोबी मंच्युरियन’ या नावाने एक कक्ष उभारण्यात आला होता. हा कक्ष एका मुसलमानाचा असल्याचे समजल्यानंतर येथील हिंदुत्वनिष्ठांनी याविषयी मंदिराचे मानकरी आणि मंदिर समितीचे सदस्य यांना सांगितले. त्यानंतर सर्वांनी कक्षाच्या चालकाची भेट घेऊन त्याला कक्ष काढायला लावला. याविषयी येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी ग्रामस्थ समितीला कळवले आहे.

अशाच प्रकारे दोडामार्गमध्ये ‘दावत ए बिर्याणी’ या नावाने कक्ष चालू करण्यात आला होता. हिंदुत्वनिष्ठांच्या प्रयत्नानंतर हा कक्ष बंद करण्यात आला होता; मात्र त्या जागेच्या हिंदु मालकाने कार्यकर्त्यांना धमकावल्याचे सांगत याविषयी काही जणांनी खंत व्यक्त केली.