मदरशांतील शिक्षकांच्‍या मानधनवाढीपेक्षा मदरशांवरच बंदी का घालत नाही ? – अजयसिंह सेंगर, महाराष्‍ट्र करणी सेना

मदरशातून हिंदुविरोधी शिक्षण दिले जात असण्‍याला विरोध

अजयसिंह सेंगर, महाराष्‍ट्र करणी सेना

मुंबई – मदरशांतून हिंदुविरोधी शिक्षण दिले जाते. ‘हिंदू काफीर आहेत’, असे शिकवले जाते. अशा प्रकारे मदरशांतून धार्मिक उन्‍माद निर्माण केला जात आहे, हे ठाऊक असतांनाही मदरशांतील शिक्षकांना देण्‍यात येणारे ६ सहस्र रुपये एवढे मानधन वाढवून ते १६ सहस्र रुपये केले गेले. राज्‍यात अंगणवाडी शिक्षिका वेतनवाढीसाठी आंदोलन करत आहेत. त्‍यांच्‍या मागण्‍या मान्‍य केल्‍या जात नाहीत; मात्र हिंदु मतांवर निवडून येणार्‍या महायुतीने हिंदूंवर अन्‍याय करत मुसलमान मते मिळवण्‍यासाठी मदरशातील शिक्षकांच्‍या मानधनात वाढ केली. आपल्‍या देशामध्‍ये मदरशांवर बंदी का घालण्‍यात येत नाही ?, असा प्रश्‍न महाराष्‍ट्र करणी सेनेचे प्रमुख अजयसिंह सेंगर यांनी उपस्‍थित केला आहे.