देशात कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ प्रकारचा एकही रुग्ण नाही ! – केंद्रीय आरोग्यमंत्री

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया

नवी देहली – देशात आतापर्यंत कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ प्रकारचा एकही रुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी संसदेत दिली. कोरोनाचा हा नवा विषाणू सर्वांत प्रथम दक्षिण अफ्रिकेत आढळला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ‘ओमिक्रॉन’ चिंतेचा विषय असल्याचे म्हटले आहे.