आसाममध्ये धर्मांतरित ख्रिस्त्यांनी हिंदूंच्या प्राचीन धार्मिक स्थळावरील शिवलिंग आणि त्रिशूळ उपटले !

प्राचीन वडाचे झाडही पाडून टाकले  हिंदूंना पुन्हा तेथे पूजा न करण्याची धमकी  हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रशासनाला निवेदन

  • असे व्हायला आसाम हा भारतात आहे कि पाकिस्तनात ? आसामध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !
  • धर्मांतरित ख्रिस्त्यांचा उद्दामपणा जाणा ! आज शिवलिंग आणि त्रिशूळ उपटणार्‍या अशा हिंसक प्रवृत्ती उद्या हिंदूंची मंदिरेही पाडायला पुढे-मागे पहणार नाहीत, हे लक्षात घ्या आणि असे होऊ न देण्यासाठी संघटित व्हा !

कछार (आसाम) – कटिगोरा येथील महादेव टिला येथे धर्मांतरित ख्रिस्त्यांनी हिंदूंच्या प्राचीन धार्मिक स्थळावरील शिवलिंग आणि त्रिशूळ उपटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. खासी समुदाय हा कछार जिल्ह्यातील उत्तर बरेलीतील टेकड्यांच्या पायथ्याशी रहातो. या समुदायातील बहुतांश लोकांनी ख्रिस्ती पंथ स्वीकारला आहे. येथील हिंदूंनी केलेल्या आरोपांनुसार, खासी समुदायातील ख्रिस्ती बनलेल्या लोकांनी वरील प्रकार केला. यासह त्यांनी येथील एक प्राचीन वडाचे झाडही तोडून टाकले. येथे स्थानिक मणिपुरी हिंदू गेल्या १०० वर्षांपेक्षा अधिक काळापासून शिवलिंगाची पूजा करत होते. ‘या स्थानी परत पूजा करायची नाही’, अशी धमकीही या ख्रिस्त्यांनी त्या भागातील हिंदूंना दिली.

निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते

दोषी ख्रिस्त्यांवर कारवाई करा ! – हिंदुत्वनिष्ठांची निवेदनाद्वारे मागणी

हिंदुत्वनिष्ठांना अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन दोषींवर स्वतःहून कारवाई का करत नाही ?

(वाचण्यासाठी चित्रांवर क्लिक करावे)

हे संतापजनक कृत्य करणार्‍या ख्रिस्त्यांवर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु रक्षा दल आणि हिंदु छात्र या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी येथील उपायुक्त कार्यालयात एका निवेदनाद्वारे केली. प्रशासनाने सदर ठिकाणी शिवलिंग आणि त्रिशूळ पुन्हा स्थापित करावे आणि असे प्रकार होऊ न देण्यासाठी त्या स्थानास कायमस्वरूपी लोखंडी गजांचे कडे करावे, अशीही मागणी हिंदुत्वनिष्ठांनी केली.