५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणार्‍याला फाशीची शिक्षा !

अशा गुन्हेगारांना हीच शिक्षा योग्य ! या शिक्षेची तात्काळ कार्यवाही होणेही तितकेच आवश्यक ! – संपादक

झज्जर (हरियाणा) – येथे ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणार्‍या विनोद उपाख्य मुन्ना याला अतिरिक्त सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. २० डिसेंबर २०२० या दिवशी रात्री विनोद याने मुलीच्या वडिलांना बांधून ठेवत या मुलीला घरातून पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली होती. विनोद याच्यावर २ पोलिसांच्या हत्येचेही गुन्हे नोंद आहेत. (जर आरोपीवर पूर्वीपासून अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद होती, तर त्याला कारागृहात टाकण्याऐवजी तो बाहेर कसा होता ? जर त्याला जामीन मिळाला असेल, तर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींच्या जामिनाला पोलिसांनी विरोध केला होता का ? हेही जनतेसमोर आले पाहिजे ! – संपादक)