पाकिस्तानचा प्रसारमाध्यमांचा भाजपद्वेष
इस्लामाबाद – जम्मू-काश्मीरच्या ९० सदस्यीय विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल घोषित झाले. नॅशनल कॉन्फरन्सने ९० पैकी ४२ जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेस ६ जागांवर विजयी झाली आहे. भाजपने २९ जागा जिंकल्या आहेत. पाकिस्तान काश्मीरमधील निवडणुकीवर लक्ष ठेवून होता. ‘जम्मू-काश्मीरच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धक्का, तर ओमर अब्दुल्ला यांचा विजय’ या मथळ्याखाली पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांमध्ये निवडणुकीच्या निकालाला मोठी प्रसिद्धी मिळाली. काश्मीर निवडणुकीविषयी पाक माध्यमांमधील बातम्यांमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचा विजय आणि ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री बनण्याला महत्त्व देण्यात आले आहे.
खोर्यातील जनतेकडे भाजप पाठ फिरवणार !
पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी यांच्याशी झालेल्या संभाषणात पाकिस्तानी-अमेरिकन साजिद तरार यांनी सांगितले की, काश्मीरमधील खोरे आणि जम्मू भागातील निकालांमध्ये भेद आहे. खोर्यात नॅशनल कॉन्फरन्स आघाडीवर असून जम्मूमध्ये भाजप आघाडीवर आहे. अशा स्थितीत केंद्रातील भाजप सरकार यापुढे काश्मीरसाठी निधी देऊ शकत नाही.
‘डॉन’ने केले अब्दुल्ला यांचे कौतुक !
‘भाजप पराभूत, ओमर अब्दुल्ला काश्मीरचे नेतृत्व करतील’, असे पाकिस्तानचे मोठे वृत्तपत्र डॉनने त्याच्या वृत्ताचा मथळा दिला आहे. काश्मीरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भारतीय जनता पक्षाला (भाजप) मोठा झटका बसल्याचे समा टीव्हीच्या वृत्तात म्हटले आहे.
संपादकीय भूमिका :काश्मीरमध्ये भाजप विजयी झाला असता, तर तेथील जिहादी आणि धर्मांध यांच्यावर कारवायांवर चाप बसला असता. आता अब्दुल्ला निवडून आल्यामुळे पाकचे फावले आहे. हेच तेथील प्रसारमाध्यमांनी प्रसारित केलेल्या वृत्तांतून दिसून येते ! |