बुलढाणा – येथे परिचारिका अभ्यासक्रमाची प्रश्नपत्रिका फुटली. विद्यार्थ्यांना त्यांच्या व्हॉट्सॲपच्या गटावर पूर्ण प्रश्नपत्रिका मिळाली. या प्रकरणी ५ विद्यार्थ्यांचे भ्रमणभाष जप्त करण्यात आले असून प्रश्नपत्रिका मिळालेल्या परीक्षार्थींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या वेळी शासकीय परिचारिका वसतीगृहात काही विद्यार्थी ‘कॉपी’ करतांना आढळले. एका विद्यार्थ्यांच्या शर्टाच्या बाहीवर नक्कल (कॉपी) असल्याचे आढळले. त्यांची पडताळणी केल्यावर प्रश्नपत्रिका फुटली असल्याचे समजले.
संपादकीय भूमिकापेपरफुटीच्या प्रकरणांतून विद्यार्थ्यांच्या होणार्या शैक्षणिक हानीला उत्तरदायींवर कठोर कारवाईच हवी ! |