(म्हणे) ‘मुसलमानांच्या विरोधातील हिंसा रोखली गेली पाहिजे !’

गुरुग्राम (हरियाणा) येथील सार्वजनिक ठिकाणी नमाजपठणाला देण्यात येणारी अनुमती रहित करण्यावर पाकचा थयथयाट !

  • भारतात कुठेही मुसलमानांच्या विरोधात हिंसा होत नाही, उलट धर्मांधांकडूनच देशात ठिकठिकाणी हिंदूंवर आक्रमणे केली जातात, ही वस्तूस्थिती आहे ! – संपादकीय
  • पाकने त्याच्या देशात हिंदूंवर होणार्‍या आक्रमणाविषयी आधी पहावे आणि मग भारताकडे बोट दाखवावे, असे सरकारने पाकला ठणकावले पाहिजे ! – संपादकीय

नवी देहली – भारतात अल्पसंख्यांक, विशेषतः मुसलमानांच्या विरोधातील हिंसा रोखली गेली पाहिजे. त्यांची आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचे रक्षण केले पाहिजे, असे पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. हरियाणाच्या गुरुग्राम येथे ३७ सार्वजनिक ठिकाणी नमाजपठणाला हिंदूंनी विरोध केल्यानंतर प्रशासनाने नमाजपठणाची अनुमती रहित केली. त्यावरून पाकने ही मागणी केली आहे.

पाकने म्हटले आहे की, उत्तरप्रदेश आणि हरियाणा या भाजपशासित राज्यांमध्ये कट्टरतावादी आणि अधिकारी यांच्या हातमिळवणीद्वारे मशिदींवरील आक्रमणांमुळे आम्ही चिंतीत आहोत. सातत्याने मुसलमानांच्या धार्मिक स्थळांवर आक्रमणे होत आहेत. त्रिपुरारमध्ये मुसलमान आणि त्यांच्या धार्मिक स्थळवर आक्रमणे चालू आहेत. भाजपशासित राज्यांमध्ये अशा घटनांच्या विरोधात आवाज उठवणार्‍या लोकांवर गुन्हे नोंद करून त्यांना अटक केली जात आहे. महाराष्ट्रात बजरंग दल, विश्‍व हिंदु परिषद, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप यांच्या कार्यकर्त्यांनी मुसलमानांची दुकाने अन् मशिदी यांवर आक्रमणे केली आहेत. याकडे संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना यांनी लक्ष द्यावे आणि ही आक्रमणे रोखावीत, तसेच इस्लामविषयीचा द्वेषही रोखावा, अशा मागण्या पाकने केल्या.