यापूर्वीही सापडले होते सूर्यमंदिर !
यातून हिंदु संस्कृती पूर्वी जगभरात नांदत होती, हे पुन्हा एकदा स्पष्ट होते ! – संपादक
नवी देहली – इजिप्तमधील अबू गोराबच्या वाळवंटात पुरातत्व विभागाला सूर्यमंदिर सापडले आहे. हे मंदिर ४ सहस्र ५०० वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वीही इजिप्तमध्ये एक सूर्यमंदिर सापडले होते.
मिस्र के रेगिस्तान में मिला 4500 साल पुराना सूर्य मंदिर, दावा- दशक की सबसे बड़ी खोज
विस्तार में पढ़ें: https://t.co/BNNIK6VyI7 #Egypt #ATCard #SunTempleEgypt #RE pic.twitter.com/MZKH8oAp9X— AajTak (@aajtak) November 17, 2021
१. पुरातत्व शास्त्रज्ञांच्या मते, हे मंदिर राजा फॅरो न्युसेरे इनी याने तो जिवंत असतांना बांधून घेतले होते. लोकांनी त्याला देवाचा दर्जा द्यावा, हा त्याचा उद्देश होता. दुसरीकडे त्याच्या मृत्यूनंतर लोकांनी पिरॅमिड बांधले आणि त्यात त्याला दफन केले.
२. इजिप्तच्या उत्तरेला पुरातत्व शास्त्रज्ञांना सापडलेल्या सूर्यमंदिरावरून असे कळले की, देशात आणखी सूर्यमंदिरे आहेत. त्यानंतर देशभरात या मंदिरांचा शोध चालू झाला. तेव्हा कळले की, इजिप्तमध्ये अशी ६ सूर्यमंदिरे आहेत, जी ४ सहस्र ५०० वर्षांपूर्वी बांधली गेली होती. सूर्यमंदिरांच्या उभारणीमागचा हेतू काय होता ?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे पुरातत्व शास्त्रज्ञांनी सांगितले.
३. पुरातत्व शास्त्रज्ञांनी अधिक तपास केला असता, हे मंदिर मातीच्या विटांनी बांधलेले असल्याचे आढळून आले. या मंदिराला २ फूट खोल चुनखडीचा पाया होता. मूळ मंदिर फारच प्रेक्षणीय असावे, असे जाणकारांचे मत आहे; कारण अबू गोराबमध्ये सापडलेल्या अवशेषांच्या साहाय्याने त्यांनी संगणकावर या मंदिराची रचना केली. हे मंदिर अत्यंत सुंदर दिसते. याखेरीज पुरातत्व शास्त्रज्ञांना तेथे मातीचा ‘जार’ही सापडला, ज्यात माती भरलेली होती. या भांड्यांमध्ये कोणत्याही पूजेच्या वेळी सूर्यदेवाला नैवेद्य दाखवला जात असावा, असा अंदाज शास्त्रज्ञांनी लावला.