वर्ष २०२५ पर्यंत यमुना नदीची स्वच्छता पूर्ण करणार !

देहलीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचा दावा

(डावीकडे) देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (उजवीकडे) प्रदूषित यमुना नदी

नवी देहली – देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वाधिक प्रदूषित झालेल्या यमुना नदीच्या स्वच्छतेसाठी योजना आणण्यात आल्याची माहिती दिली. ६ सूत्रांद्वारे यमुना नदीची वर्ष २०२५ पर्यंत स्वच्छता करण्यात येईल. वर्ष २०२५ मध्ये मी स्वतः नदीमध्ये डुबकी मारीन, असे केजरीवाल यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.


केजरीवाल म्हणाले की, यमुना नदीच्या स्वच्छतेचे काम युद्ध पातळीवर केले जात आहे. ६ सूत्रांद्वारे ही स्वच्छता केली जात आहे. प्रत्येक सूत्र पूर्ण करण्याची समयमर्यादा घालण्यात आली आहे. मी यावर लक्ष ठेवणार आहे.