अरुणाचल प्रदेश येथे वायूदलाचे हेलिकॉप्टर कोसळले

जीवितहानी नाही

नवी देहली – अरुणाचल प्रदेश येते भारतीय वायूदलाचे ‘एम्आय-१७’ हे हेलिकॉप्टर कोसळले. यातील २ वैमानिक आणि ३ कर्मचारी बचावले. या हेलिकॉप्टरने प्रशिक्षणासाठी उड्डाण केले होते. या अपघाताची चौकशी करण्यात येणार आहे. यापूर्वी वर्ष २०१७ मध्ये ‘एम्आय-१७-व्ही५’ हे हेलिकॉप्टर कोसळले होते. यात ७ सैनिक हुतात्मा झाले होते.