सलमान खुर्शिद यांच्या पुस्तकावर बंदी घालण्यास देहली येथील न्यायालयाचा नकार

केंद्र सरकारने स्वतःहूनच या हिंदुद्वेषी पुस्तकावर बंदी घातली पाहिज, असे हिंदूंना वाटते ! काँग्रेसच्या राजवटीत मुसलमानांनी मागणी केल्यानंतर सलमान रश्दी यांच्या ‘सॅटनिक व्हर्सेस या पुस्तकावर तात्काळ बंदी घालण्यात आली होती. ‘काँग्रेस असे करू शकते, तर आताचे सरकारही करूच शकते’, असे हिंदूंना वाटते ! – संपादक

नवी देहली – देहली येथील पटियाला हाऊस न्यायालयाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ या हिंदुद्वेषी पुस्तकाचे प्रकाशन आणि विक्री यांवर बंदी घालण्याची हिंदु सेनेने केलेली मागणी फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकारावर बंदी घातली जाऊ शकत नाही. याचिकाकर्ते पुस्तकाच्या विरोधात प्रचार करू शकतात, तसेच धार्मिक भावना दुखावल्यावरून पुस्तकातील सूत्रांचे खंडनही करू शकतात.