लव्ह जिहाद आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार या घटनांच्या बातम्या

उत्तरप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा असतांना या संदर्भातील प्रकरणे न्यून होण्याऐवजी वाढत आहेत. त्यामुळे कायद्यात किंवा त्याच्या अंमलबजावणीमध्ये न्यूनता असेल, तर ती तात्काळ दूर करून हिंदूंना या दुष्टचक्रातून सोडवणे आवश्यक आहे !

‘एस्.टी.’च्या संपामुळे खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट !

प्रादेशिक परिवहन विभागाची डोळेझाक !, सांगली-कोल्हापूर २०० रुपये, तर कोल्हापूर-पुणे १ सहस्र रुपयांची आकारणी

मराठी भाषेतूनही केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होता येते ! – सुब्रह्मण्य केळकर, सनदी (आय.पी.एस्.) अधिकारी

ज्या ज्या क्षेत्रात, जे जे कराल ते उत्तम करा, असे मार्गदर्शन मराठी भाषेतून यु.पी.एस्.सी.ची परीक्षा उत्तीर्ण झालेले अन् भारतीय पोलीस सेवा (आय.पी.एस्.) अधिकारी म्हणून तमीळनाडू येथे सेवारत असलेले सुब्रह्मण्य केळकर यांनी केले.

नागपूर शहरात दिवाळीत १० ठिकाणी आगीच्या घटना !

फटाके उडवल्याने पैशांची उधळपट्टी होऊन त्यासमवेत शारीरिक आणि मानसिक त्रासही होतो. फटाक्यांमुळे होणार्‍या जखमेच्या यातना आयुष्यभर भोगाव्या लागतात. ही स्थिती पहाता आणि राष्ट्र आर्थिक संकटात असल्याने नागरिकांनी फटाके उडवण्याचे टाळावे !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसर्‍या दिवशीही एस्.टी.ची सेवा ठप्प

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे (एस्.टी.चे) राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यात एस्.टी.च्या कर्मचार्‍यांनी ८ नोव्हेंबरपासून संप चालू केला आहे.

खंडणी प्रकरणी आणखी दोन पोलीस अधिकारी अटकेत !

विकासक श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या विरोधात खंडणी वसुलीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दिवंगत मीनाताई ठाकरे यांच्या नावे सक्षम महिला सरपंचांना पुरस्कार देणार ! – ग्रामविकास राज्यमंत्री सत्तार

राज्यमंत्री सत्तार पुढे म्हणाले की, आपल्याकडे ५० टक्के महिला सरपंच आहेत. विकासाचे ‘व्हिजन’ (दृष्टी) महिलांकडे आहे. त्यांना संधी मिळायला हवी.

अनेक वर्षांची स्वामी समर्थांच्या दर्शनाची इच्छा पूर्ण झाली ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

मी श्री स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त आहे. स्वामींमुळेच जीवनामध्ये आरोग्य, स्थैर्य आणि समाधान आहे. त्यामुळे श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे येऊन स्वामींचे दर्शन घेण्याचा मानस होता. स्वामींच्या कृपेने ती इच्छा आज पूर्ण झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या दिवाळीनिमित्तच्या कार्यक्रमात कलाकार सपना चौधरीचा नाच !

नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून नाचाच्या कार्यक्रमाचे आयोजन करणारे नेते कधीतरी जनहित साधू शकतील का ?