
सातारा, ९ नोव्हेंबर (वार्ता.) – मी श्री स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त आहे. स्वामींमुळेच जीवनामध्ये आरोग्य, स्थैर्य आणि समाधान आहे. त्यामुळे श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे येऊन स्वामींचे दर्शन घेण्याचा मानस होता. स्वामींच्या कृपेने ती इच्छा आज पूर्ण झाली, असे मनोगत विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
या वेळी भाजपचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामीजी, माजी मंत्री सुभाष बापू देशमुख, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, आमदार सचिन कल्याणशेट्टी, मंदार पुजारी, व्यंकटेश पुजारी, मंदिर समितीचे आत्माराम घाटगे, श्रीशैल गवंडी आदी मान्यवर उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस अक्कलकोट दौर्यावर असतांना त्यांनी अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट दिली. या वेळी मंदिर समितीच्या वतीने अध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद आणि प्रतिमा देऊन फडणवीस यांचा यथोचित सत्कार केला.
बिबवेवाडीतील (पुणे) रस्त्यावरील शोभिवंत १०० दिवे चोरीला !
महापालिकेतील उपायुक्तांचा पुतण्या असल्याचे सांगून फसवणूक करणारा कह्यात !
सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ ठाकरे गटाची मुंबईत सभा !
श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठावरील बटूंच्या यशाची मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून नोंद
मुंबई उच्च न्यायालयाकडून वर्ष २०१३ मधील ३५ सहस्र कोटी रुपयांच्या खाण घोटाळ्यासंबंधीचा गुन्हा रहित
सरकारमधील विविध खात्यांमध्ये ४५० अभियंत्यांची पदे रिक्त असून स्थानिकांनी या संधीचा लाभ घ्यावा ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री