उत्तरप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’चा भस्मासूर !
|
|
पिलीभीत (उत्तरप्रदेश) – येथील सुनगी भागामध्ये मशरूर नावाच्या एका डॉक्टरने स्वत:चे नाव अमित असल्याचे सांगून एका विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि नंतर तिचे धर्मांतर केले. धर्मांधाने मुलीला सज्ञान दाखवण्यासाठी तिच्या अधारकार्डवरील नाव आणि जन्मतिथी यांमध्येही पालट केला. यात आरोपीच्या कुटुंबियांनी साहाय्य केले. ‘डॉ. मशरूर याने उपचारांच्या निमित्ताने मुलीला फसवून बलात्कार केला आणि नंतर तिचे धर्मांतर केले’, असा आरोप पीडितेच्या आईने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ७ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
पीडितेच्या आईने पोलिसांना सांगितले की, त्यांची १६ वर्षीय मुलगी १२ व्या इयत्तेत शिकते. स्वत: अमित असल्याचे सांगणारा मशरूर तिला महाविद्यालयाच्या फाटकाजवळ भेटला होता. त्याने सांगितले की, तो जिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर आहे. आरोपीने उपचार करण्याच्या निमित्ताने तिला खोलीत बोलावले. अशा प्रकारे आरोपीने पीडितेला अनेक वेळा खोलीत बोलावून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि विवाह करण्याचे आमीष देऊन तिचे लैंगिक शोषण केले.
पीडितेच्या आईने सांगितले की, आरोपीने पीडितेच्या शोषणाची चित्रफीत बनवली. त्यानंतर आरोपीने त्याच्या कुटुंबियांसमवेत मुलीचे धर्मांतर केले आणि नवीन आधारकार्ड बनवले. २५ ऑक्टोबर या दिवशी पीडिता आरोपीच्या खोलीत असल्याची सूचना मिळाली. पीडितेचे नातेवाईक खोलीमध्ये पोहोचले, तेव्हा ती बेशुद्धावस्थेत असल्याचे दिसले. पीडितेला शुद्ध आली, तेव्हा तिने सर्व प्रकार कथन केला. त्यानंतर ‘पीडितेने धर्मांतर केले आहे. पोलीस तक्रार केल्यास तिला जिवे मारून टाकेन’, अशी धमकी आरोपीने दिली. त्यानंतर त्याने तेथून पलायन केले. आरोपीने पीडितेच्या आधारकार्डवर तिची जन्मदिनांक २ मे २००५ असतांना त्यात पालट करून २ मे २००३ केली होती. या प्रकरणी पोलिसांनी डॉ. मशरूर, मूबिना बेगम उपाख्य बीना बेगम मतलूफ, आरोपीचा भाऊ आणि अन्य तिघे जण यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
इस्लाम न स्वीकारल्याने धर्मांधाकडून हिंदु पत्नीची हत्या !
- १० वर्षांपूर्वी आरोपीने हिंदु असल्याचे सांगून लग्न केले होते
- तिने प्रेम केले, त्याने गळा कापला !
स्वत:ची खरी धार्मिक ओळख लपवून आणि हिंदु असल्याचे सांगून गेल्या अनेक वर्षांपासून धर्मांध हिंदु महिलांची फसवणूक करत आहेत. त्यामुळे हिंदु मुली, महिला आणि त्यांचे कुटुबीय यांनी अनोळखी व्यक्तींपासून सावध रहाणे, हाच यावर उपाय आहे !
बरेली (उत्तरप्रदेश) – इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे इक्बाल याने पत्नी निशा हिची तिच्या मुलींसमोर हत्या केली. १० वर्षांपूर्वी इक्बाल याने स्वत: हिंदु असल्याचे सांगून निशा यांच्याशी लग्न केले होते. पाेलिसांनी आरोपीच्या विरोधात हत्या आणि ‘धर्मांतर निषेध अधिनियम २०२१’ या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. आरोपी पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
१. एका नातेवाइकाच्या विवाह समारंभात दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम जुळले होते आणि त्यांनी लग्न केले होते. कालांतराने ‘तो मुसलमान असून त्याला पहिल्या पत्नीपासून ४ मुले आहेत आणि ती मुलांसमवेत जाफरपूर येथे रहाते’, असे तिला कळले.
२. इक्बालने चुरई दलपतपूर येथे घर बांधले होते. त्याने तडजोड केल्यानंतर निशा त्याच्या समवेत राहू लागली. निशाने तिचा धर्म पालटला नव्हता. त्यामुळे मागील १० वर्षांपासून ती हिंदु पद्धतीप्रमाणे रहात होती. याला इक्बालचा आक्षेप होता. त्यामुळे इक्बालने त्याच्या सहकार्यांच्या साहाय्याने निशाची हत्या केली.
३. निशाच्या आईने सांगितले की, इक्बाल सातत्याने निशावर मुसलमान होण्यासाठी दबाव टाकत होता. यासाठी तो तिचा छळही करत होतात. याशिवाय तो निशाच्या नावावरील संपत्ती त्याच्या पहिल्या पत्नीच्या नावे करण्याची धमकी देत होता.
४. दोघा पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर आरोपीने त्याच्या सहकार्यांना घरी बोलावले आणि निशाची गळा आवळून हत्या केली. त्याने मुली रिया आणि रोशनी यांना धमकी दिली की, जर त्यांनी हत्येची माहिती इतरांना सांगितली, तर तो त्यांनाही ठार करेल. निशाचा मृतदेह २६ ऑक्टोबर या दिवशी रात्री लटकलेल्या स्थितीत आढळून आला.