हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचे मुंबई येथील कार्यक्रम रहित करावेत !

सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारा गुजरात येथील हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचा मुंबईत होणारा ‘डोंगरी टू नोवेअर’ या शीर्षकाचा विनोदी कार्यक्रम (कॉमेडी शो) रहित करावा, अशी मागणी मुंबई येथील ‘सॅफरॉन थिंक टँक’ या संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

न्यायदानाची प्रक्रिया गतीमान करण्याची आवश्यकता ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

न्यायदान प्रक्रियेच्या विलंबात सर्वसामान्य माणूस पिचला जातो. न्यायालयात चकरा मारून त्याचे आयुष्य संपते आणि न्यायालयीन व्ययही परवडत नाही. त्यामुळे न्यायदानाची प्रक्रिया गतीमान करण्याची आवश्यकता आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

भाजपकडून मुंबईमध्ये ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारा’ आंदोलन !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अवमानकारक ‘ट्वीट’ करणारे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या प्रतिमेला भाजपच्या वतीने २२ ऑक्टोबर या दिवशी ‘जोडे मारा’ आंदोलन करण्यात आले. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांच्या कांदिवली येथील कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलन करण्यात आले.

बांगलादेशमधील हिंदूंवरील आक्रमणाच्या विरोधात पणजी येथे इस्कॉनच्या वतीने निषेध मोर्चा

गोमंतकीय हिंदूंनो, हिंदूंवरील आक्रमणाविषयी लोकप्रतिनिधी गप्प आहेत. निवडणुकीसाठी ते मत मागायला येतील, तेव्हा ‘त्यांनी या प्रकरणी मौन का पत्करले ?’ ते विचारा !

केरळमधील हिंदुत्वनिष्ठ बिनिल सोमसुंदरम् यांचे निधन

केरळच्या एर्नाकुलम् येथील प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ बिनिल सोमसुंदरम् (वय ४० वर्षे) यांचे २३ ऑक्टोबर या दिवशी कोट्टयम् वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात ‘कार्डिक अरेस्ट’मुळे निधन झाले. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.

रस्ते वाहन चालवण्यासाठी आहेत, नमाज पढण्यासाठी नव्हे !

‘रस्ते हे नमाज पढण्यासाठी नव्हेत, तर वाहन चालवण्यासाठी आहेत’, असा संदेश देणारे विज्ञापन गायक फाजील पुरीया यांनी सामाजिक माध्यमांवर प्रसारित केले आहे.

गोवा ‘विकासाचा आदर्श नमुना (मॉडेल)’  म्हणून ओळखला जाणार !  नरेंद्र मोदी, पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑनलाईन’ पद्धतीने गोमंतकियांशी साधला संवाद

पुण्यातील ‘समृद्ध जीवन’चे महेश मोतेवार यांच्या ५ आलिशान गाड्या जप्त !

येथील ‘समृद्ध जीवन’ आर्थिक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी महेश मोतेवार यांच्या ५ आलिशान गाड्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या गाड्यांमध्ये मायक्रा, स्वीफ्ट डिझायर, मिनी कूपर, पजेरो या वाहनांचा समावेश आहे.

भाजप गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पदावरून उतरण्यास सांगू शकतात !  देहलीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया यांचा दावा

भाजप लवकरच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना पदावरून उतरण्यास सांगून त्याजागी नवीन मुख्यमंत्री नेमू शकतात, असा दावा देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी देहली येथे पत्रकारांशी बोलतांना केला.