धुमसते काश्मीर !

जिहादी आतंकवाद्यांनी श्रीनगर येथील संगाम ईदगाह परिसरातील एका शाळेत घुसून मुख्याध्यापिका सतिंदर कौर आणि शिक्षक दीपक चंद यांची गोळ्या झाडून हत्या केली. गेल्या ५-६ दिवसांत आतंकवाद्यांनी एकूण ७ जणांची हत्या केली आहे. त्यामुळे या सर्वच घटना ‘आतंकवादाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे…

साहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांना १ लाख रुपयांची लाच घेतांना अटक !

कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार ! अशा भ्रष्ट अधिकार्‍यांचा भरणा असणारे पोलीस दल जनतेला कधी न्याय मिळवून देईल का ? अशांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !

चाकण (पुणे) औद्योगिक वसाहतीतील कामगारांमुळे स्थानिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा !

बहुतांश आस्थापनांतील कामगार लसीकरणासाठी येत आहेत; मात्र आस्थापनांनी सरकारच्या आदेशानुसार कामगारांना त्यांच्या निधीतून लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना रुग्णालयात लस उपलब्ध होईल.

संत ज्ञानेश्वरांचे चरित्र शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे ! – बापूसाहेब ढगे, उपाध्यक्ष, भावसार शिक्षण प्रसारक मंडळ

सोलापूर येथील विद्यानिकेतन प्रशालेत श्री ज्ञानेश्वरी जयंती उत्साहात साजरी

नेर (यवतमाळ) येथील शिवसैनिकांचे जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन !

तालुक्यातील शेतकर्‍यांची अतीपावसामुळे अपरिमित हानी झाली. त्याची भरपाई द्यावी, तसेच ओला दुष्काळ घोषित करावा, अशा मागणीचे निवेदन शिवसैनिकांनी जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

व्यसनाधीनतेला प्रोत्साहन देणारी मनोवृत्ती घातक !

व्यसनाधीनतेचे समर्थन होणे, यातून देशाची तरुण पिढी भरकटत चालली आहे, हे यातून दिसून येते….

राहुल गांधी यांच्यानंतर प्रियांका वाड्रा यांचा नाटकीपणा जाणा !

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका वाड्रा यावर्षी नवरात्रीचे व्रत करणार आहेत, अशी माहिती काँग्रेसने सामाजिक माध्यमांद्वारे दिली. यावर सामाजिक माध्यमांवरून वाड्रा यांच्यावर उपरोधिक टीका करण्यात येत आहे.

भारत ‘हिंदु राष्ट्र’ झाल्यावर ‘बॉलीवूड’वाल्यांचे हिंदु धर्माच्या विरोधात बोलण्याचे धाडस होणार नाही ! – शरद पोंक्षे, हिंदुत्वनिष्ठ अभिनेते

भारताची फाळणी धर्माच्या नावावर झाल्यावर मुसलमानांना पाकिस्तान हे ‘इस्लामी राष्ट्र’ म्हणून मिळाले. काँग्रेसच्या गलिच्छ राजकारणामुळे भारत हा हिंदूंना न मिळता ‘सेक्युलर’ (निधर्मी) देश झाला. याचे अनेक दूरगामी परिणाम झाले….

भारतात नार्काेटिक जिहाद ?

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !

शक्तिदेवता !

देवी चंद्रघण्टा हे पार्वतीचे विवाहित रूप आहे. देवी पार्वतीचा शिवाशी विवाह झाल्यावर तिने तिच्या मस्तकावर घंटा रूपात अलंकार म्हणून चंद्र धारण केला आहे. देवीचे चंद्रघण्टा हे रूप सदैव शस्त्रसज्ज असते. ती दशभुजा असून तिची कांती सुवर्णमय आहे. चंद्रघण्टा देवीकडे असलेल्या घंटेतून बाहेर पडणार्‍या चंड-ध्वनीला दानव सदैव घाबरतात.