कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार ! अशा भ्रष्ट अधिकार्यांचा भरणा असणारे पोलीस दल जनतेला कधी न्याय मिळवून देईल का ? अशांवर कठोर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक
मुंबई – मेघवाडी (जोगेश्वरी) विभागाच्या साहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांना १ लाख रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडून अटक केली. काही दिवसांपूर्वी सुजाता यांनी एका प्रकरणासाठी एक लाख रुपयांची मागणी केली होती. याचा ४० सहस्र रुपयांचा पहिला हफ्ता घेतांना त्यांना अटक करण्यात आली.