नेर (यवतमाळ) येथील शिवसैनिकांचे जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन !

नेर (यवतमाळ), ८ ऑक्टोबर (वार्ता.) – तालुक्यातील शेतकर्‍यांची अतीपावसामुळे अपरिमित हानी झाली. त्याची भरपाई द्यावी, तसेच ओला दुष्काळ घोषित करावा, अशा मागणीचे निवेदन शिवसैनिकांनी जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना दिले आहे.