खंडणी मागणार्‍या एका सराईत गुन्हेगारासह तिघांना पुणे येथे अटक !

गुन्हेगारी टोळीचा जम बसवण्यासाठी व्यावसायिकाकडे २ लाख रुपयांची खंडणी मागून तडजोडीअंती १ लाख रुपये घेणार्‍या एका सराईत गुन्हेगारासह तिघांना पुणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे.

आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला !

आता आर्यन खान आणि इतर सर्व आरोपींना आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले आहे, तर मुनमुन आणि नुपूर यांना भायखळा महिला कारागृहात पाठवण्यात आले आहे.

द्वितीयेला श्री महालक्ष्मीदेवीची माहेश्वरी रूपातील अलंकार पूजा !

नवरात्रात द्वितीयेला कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीची माहेश्वरी रूपातील अलंकार पूजा बांधण्यात आली होती. शुंभ-निशुंभ दैत्यांच्या वधाच्या प्रसंगी रक्तबीज दैत्याचा संहार करण्यासाठी देवाची मूर्तीमंत शक्ती प्रकट झाली.

धाड टाकणे हा केंद्रीय यंत्रणांच्या अधिकाराचा अतिरेक !

आयकर विभागाने केलेल्या धाडसत्राच्या संदर्भात शरद पवार यांची प्रतिक्रिया !

मुंबई विद्यापिठाच्या वार्षिक अधिसभेत कुलगुरु आणि सदस्य यांच्यात समन्वयाचा अभाव !

दीड वर्षाने प्रत्यक्ष झालेल्या या सभेत कुलगुरु आणि सदस्य यांच्या बोलण्याचा एकमेकांशी ताळमेळच नव्हता. कुलगुरूंच्या उत्तरांनी सदस्यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे संपूर्ण सभेत गोंधळाची स्थिती होती.

माहीम (मुंबई) येथील काशी विश्वेश्वर मंदिराच्या विश्वस्तांविरुद्ध गुन्हा नोंद !

माहीम येथील पुरातन आणि जागृत देवस्थान असलेल्या काशी विश्वेश्वर मंदिरातील प्राचीन मूर्ती गायब झाल्याच्या प्रकरणी माहीम पोलिसांनी ७ ऑक्टोबरला रात्री उशिरा मंदिर विश्वस्तांविरुद्ध गुन्हा नोंदवला. यामध्ये देवस्थानचे विश्वस्त जयवंत देसाई, शैला पठारे, पद्माकर साहनी आणि संजीव परळकर यांना आरोपी करण्यात आले आहे

खरा ‘मानवताधर्म’ स्थापन करण्याची संजीवनी बुटी म्हणजे सनातनची ग्रंथसंपदा ! – पू. सचिनदेव महाराज, अमरावती

अभियानाच्या निमित्ताने संत श्री अच्युत महाराज यांचे उत्तराधिकारी पू. सचिनदेव महाराज यांचे आशीर्वाद घेण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे आणि श्री. कपिल देव यांनी ६ ऑक्टोबर या दिवशी त्यांची भेट घेतली.

सावर्डे येथे रात्रीच्या वेळी विनाअनुज्ञप्ती पक्षाचे कापडी फलक लावणार्‍या ‘तृणमूल काँग्रेस’च्या कार्यकर्त्यांना स्थानिकांनी रोखले

विनाअनुज्ञप्ती पक्षाचे कापडी फलक लावून ‘तृणमूल काँग्रेस’ने स्वतःचा रंग दाखवायला प्रारंभ केला, असेच म्हणावे लागेल !

अवैध पशूवधगृहे उद्ध्वस्त करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या आंदोलनामुळे ४ पशूवधगृहे त्वरित ‘सील’ !

अवैध पशूवधगृहे बंद करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांना आंदोलन का करावे लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ?

गणेशोत्सवाच्या काळात पूजेसंबंधी सेवांच्या मागणीत ७२ टक्‍क्‍यांनी वाढ !

मागील वर्षी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे निर्बंध लादले होते. त्यामुळे उत्सव साजरे करण्यावर मर्यादा आल्या होत्या. मात्र यंदा मागील वर्षीच्या तुलनेने बंधने अल्प असल्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात पूजेसंबंधी सेवांच्या मागणीत ७२ टक्‍क्‍यांनी वाढ झाली.