फ्रान्सप्रमाणे चर्चच्या कारवायांची चौकशी करण्यासाठी भारतातही चौकशी आयोगाची स्थापना करावी ! – डॉ. सुरेंद्र जैन, संयुक्त महामंत्री, विश्व हिंदु परिषद

भारतातही पाद्री आणि धर्मांतराच्या कारवायांमध्ये सहभागी असलेले ख्रिस्ती प्रचारक यांची दुष्कृत्ये उघड करणे अन् त्यांच्या घृणास्पद षड्यंत्रापासून देशाला मुक्ती देणे यांसाठी राष्ट्रीय स्तरावर एक चौकशी आयोग स्थापन करावा.

चेन्नई (तमिळनाडू) येथील ‘श्री टीव्ही’वर पितृपक्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

येथील ‘श्री टीव्ही’ वाहिनीच्या वतीने पितृपक्षाच्या निमित्ताने विशेष प्रश्नोत्तराच्या सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी पितृपक्षाविषयी विचारलेल्या प्रश्नांना अध्यात्मदृष्ट्या उत्तरे दिली

अमली पदार्थविरोधी पथकाकडून गोव्यात वर्षभरात १२ मुख्य अमली पदार्थ व्यवहारांवर कारवाई !

अमली पदार्थविरोधी पथकाचे मुंबई आणि गोवा विभाग यांनी संयुक्तपणे गोव्यातील १२ मुख्य अमली पदार्थ व्यवहारांवर कारवाई केली आहे, अशी माहिती अमली पदार्थविरोधी पथकाचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी दिली.

वणी (यवतमाळ) येथे अतीवृष्टीमुळे २५ कोटी रुपयांच्या हानीचा अंदाज !

कापसाची बोंडेही सडली. कापसाची झाडे पडून सडून गेली. फुले-पात्या हेही गळून हानी झाली. ‘एकूणच झालेली हानीभरपाई मिळावी’, ही शेतकर्‍यांची मागणी आहे.

संभाजीनगर येथे एकच अभ्यास ३ वेळा विद्यार्थ्यांना शिकवावा लागत असल्याने शिक्षक त्रस्त !

पूर्ण क्षमतेने शाळा चालू करण्याची शिक्षकांची मागणी

श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश केल्याच्या प्रकरणी भाजपचे आचार्य तुषार भोसले यांच्यावर गुन्हा नोंद !

श्री तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी ७ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ६ वाजल्यापासून खुले करण्याचा निर्णय संस्थानने घेतला होता. असे असतांना आचार्य तुषार भोसले यांनी दुपारी तुळजाभवानी मंदिरात पूजा-अर्चा आणि आरती केली होती.

किनारी विभाग व्यवस्थापन आराखडा डिसेंबरपर्यंत अंतिम न केल्यास पर्यावरण सचिवांचे वेतन रोखून ठेवा ! – राष्ट्रीय हरित लवादाची सूचना

हरित लवादाने ८ ऑक्टोबरला या प्रकरणी आदेश काढतांना किनारी विभाग व्यवस्थापन आराखडा ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत अंतिम न केल्यास राज्याच्या पर्यावरण सचिवांचे वेतन १ जानेवारी २०२२ पासून आराखडा पूर्ण होईपर्यंत रोखून ठेवण्याची सूचना केली आहे.

‘क्रूझ’वरील पार्टीतून कह्यात घेतलेल्या भाजप नेत्याच्या मेहुण्याला सोडले ! – नवाब मलिक, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

नवाब मलिक म्हणाले की, केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने ‘क्रूझ’वर टाकलेल्या धाडीमध्ये १० जणांना कह्यात घेतल्याचे अधिकारी समीर वानखेडे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते…

११ वी अणि १२ वी इयत्तांच्या परीक्षा प्रत्यक्ष घेण्यास शिक्षण खात्याची मान्यता

कोरोना महामारीशी संबंधित सर्व नियमांचे पालन करून राज्यातील उच्च माध्यमिक शाळांना ११ वी अणि १२ वी इयत्तांच्या परीक्षा प्रत्यक्ष घेण्यास शिक्षण खात्याने मान्यता दिली आहे.

नागपूर येथे प्रियकरासमवेत फिरायला गेलेल्या तरुणीवर ४ तरुणांकडून बलात्कार 

बलात्कार्‍यांना तात्काळ फाशीची शिक्षा झाल्यासच अशा घटना थांबतील, हे सरकारी यंत्रणांना कधी कळणार ?