मुंबई – ‘कॉर्डेलिया क्रूझ’वरील पार्टीत कह्यात घेतलेल्यांपैकी दोघांना सोडून देण्यात आले असून त्यात भाजप नेत्याचा मेहुणा होता, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. ‘याविषयी मी स्पष्टीकरण देणार आहे’, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नवाब मलिक म्हणाले की, केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने ‘क्रूझ’वर टाकलेल्या धाडीमध्ये १० जणांना कह्यात घेतल्याचे अधिकारी समीर वानखेडे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते. यामध्ये त्या दोन जणांचाही समावेश होता; मात्र काही घंट्याने त्यांना सोडण्यात आले.