कर्नाटकच्या कटीलू आणि पोळली येथील देवीच्या मंदिरांत येण्यासाठी भाविकांना पारंपरिक पोशाख बंधनकारक !

‘कर्नाटक धार्मिक परिषदे’चे अभिनंदन ! देशातील प्रत्येक मंदिरामध्ये पारंपरिक पोशाख बंधनकारक केले पाहिजे, असेच धर्मप्रेमी हिंदूंना वाटते !

जीवनावश्यक गोष्टींसाठी गोव्याला स्वयंपूर्ण बनवण्याच्या प्रयत्नांना यश ! – मुख्यमंत्री

गोवा शासनाने गोमंतकियांच्या हितासाठी एकूण १५२ योजना राबवण्यासमवेतच जनहितासाठी १२२ सेवा ‘ऑनलाईन’ स्वरूपात प्रारंभ केल्या आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ५० सहस्रांहून अधिक

जिल्ह्यात गेल्या २४ घंट्यांत कोरोनाचे ६१ नवीन रुग्ण आढळले, तर ५ जणांचा मृत्यू झाला.

आंबोली येथे २० किलो चंदन पोलिसांच्या कह्यात

आंबोली येथील पोलीस तपासणी नाक्यावर एका दुचाकी चालकाकडून पोलिसांनी चंदनाच्या लाकडाचे २० किलो वजनाचे तुकडे आणि दुचाकी कह्यात घेतली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवणार ! – उदय सामंत, पालकमंत्री, सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी होणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती यांसह अन्य सर्वच निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढवेल, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

बांदा येथे अनुमतीहून अधिक खडीची वाहतूक करणार्‍या ७ डंपरवर महसूल विभागाची कारवाई

‘ओव्हरलोड’ वाहतुकीविषयी तक्रार आली नसती, तर ही वाहतूक अशीच चालू राहिली असती, असे समजायचे का ? कि ‘तक्रार आली, तरच कारवाई करू’, अशी प्रशासनाची मानसिकता झाली आहे ?

चिपी येथील ‘सिंधुदुर्ग विमानतळा’चे आज उद्घाटन कणकवलीत शिवसेनेकडून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण

जिल्हावासियांना याचा आनंद घेता यावा, यासाठी शिवसेनेच्या वतीने कणकवली शहरातील अप्पासाहेब पटवर्धन चौकात सकाळी ११ वाजता मोठी ‘स्क्रीन’ (मोठा पडदा) लावून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

साधनेचे महत्त्व !

‘राजकीय पक्ष ‘हे देऊ, ते देऊ’, असे सांगून जनतेला स्वार्थी आणि शेवटी दुःखी बनवतात. याउलट साधना हळूहळू सर्वस्वाचा त्याग करायला शिकवून चिरंतन आनंदाची, ईश्‍वराची प्राप्ती कशी करायची, हे शिकवते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले