वणी (यवतमाळ), ८ ऑक्टोबर (वार्ता.) – येथे सप्टेंबर २०२१ मध्ये झालेल्या अतीवृष्टीमुळे सोयाबीन आणि कापूस या रोख पिकांची २४ कोटी ३ लाख ५२ सहस्र ८०० रुपयांची हानी झाल्याचा अंदाज महसूल मंडळातील निरीक्षणातून लक्षात आला. सोयाबीन ओले झाल्याने आणि अतीपावसामुळे कोंब येऊन ते सडून गेले. कापसाची बोंडेही सडली. कापसाची झाडे पडून सडून गेली. फुले-पात्या हेही गळून हानी झाली. ‘एकूणच झालेली हानीभरपाई मिळावी’, ही शेतकर्यांची मागणी आहे.