पठाणकोट (पंजाब) येथील वायूदलाच्या तळावरील आक्रमणासाठी भ्रष्ट पोलीस अधिकार्‍यांनी साहाय्य केले ! – दोघा विदेशी पत्रकारांच्या पुस्तकात दावा

अशा भ्रष्ट आणि देशद्रोही पोलीस अधिकार्‍यांना फाशी देण्यासाठी सरकार काय पावले उचलणार ?

पुराने वेढल्यामुळे स्थलांतरित झालेल्यांना मिळणार १० सहस्र रुपये सानुग्रह अनुदान ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली

ज्या नागरिकांचे घर, क्षेत्र पुराने वेढल्यामुळे त्यांना स्थलांतरित व्हावे लागले अशांनाही आता १० सहस्र रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.

कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि भाजप पदाधिकारी यांच्यात खडाजंगी !

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील परिचारकांच्या स्थानांतरणासह मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्याच्या वेळी कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि भाजप पदाधिकारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

निधन वार्ता

सनातनचे साधक श्री. शनिकुमार यादव यांचे वडील मारुति चंद्रु यादव (वय ८२ वर्षे) यांचे १३ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ७ वाजता रहात्या घरी आजारपणाने निधन झाले. सनातन परिवार यादव कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.

१४ ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी वेदना स्मृतीदिन’ म्हणून ओळखला जाणार ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा

फाळणीच्या वेळी महंमद अली जिना यांच्या ‘डायरेक्ट अ‍ॅक्शन’मध्ये (थेट कारवाईमध्ये) मारल्या गेलेल्या हिंदूंना प्रतिवर्षी भारत सरकारने श्रद्धांजली देऊन त्यांची आठवण काढली पाहिजे !

तालिबानने सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न केल्यास अफगाणिस्तान पूर्णपणे अलिप्त होण्याची भीती ! – संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस

अशी वक्तव्ये करत बसण्यापेक्षा संयुक्त राष्ट्रे तालिबानचा निःपात करण्यासाठी प्रयत्न का करत नाही ?

प्रतिवर्षी कोरोनाची लस घ्यावी लागणार ! – अमेरिकेच्या व्हाईट हाऊसचे मुख्य सल्लागार डॉ. फाऊची

अमेरिकेच्या व्हाईट हाऊसचे मुख्य सल्लागार डॉ. फाऊची यांनी ‘कोरोना विषाणू प्रबळ होत असून लोकांना अनिश्‍चित काळासाठी प्रतिवर्षी कोरोनाची लस घ्यावी लागेल’, असे म्हटले आहे.

भारतासह १२ देशांकडून अफगाणिस्तानमध्ये तालिबानला ‘राज्यकर्ते’ म्हणून मान्यता देण्यास विरोध

केवळ बाराच देश का ? जगातील सर्वच देशांनी तालिबानचा विरोध करून त्याचे शासन आल्यास अफगाणिस्तानवर बहिष्कार घातला पाहिजे !

(म्हणे) ‘भारताने ठरवावे कि तो तालिबानला मित्र मानतो कि शत्रू ?’ – तालिबान

एका छोट्याशा देशातील आतंकवादी संघटना भारताच्या संदर्भात अशी उद्दाम भाषा वापरते आणि भारत असली विधाने खपवून घेतो, हे लज्जास्पद ! तालिबानला अद्दल घडवण्यासाठी भारत सरकार कोणती पावले उचलणार ? अमेरिकेच्या सैन्याने अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतल्यानंतर तालिबानच्या आतंकवाद्यांना कंठ फुटला आहे. तालिबानची बोलती बंद करण्यासाठी त्याच्या उरात धडकी भरेल, अशी भारताने कारवाई करावी ! काबूल – … Read more

प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या विरोधात स्वदेशी अ‍ॅप ‘कू’च्या मोहिमेला प्रचंड प्रतिसाद !

हिंदु जनजागृती समितीने १६ हून अधिक वर्षांपासून चालू केलेल्या प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर न करण्याच्या चळवळीला आज राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे, याविषयी समितीचे कौतुक करावे तितके थोडेच !