प्रतिवर्षी कोरोनाची लस घ्यावी लागणार ! – अमेरिकेच्या व्हाईट हाऊसचे मुख्य सल्लागार डॉ. फाऊची

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेच्या व्हाईट हाऊसचे मुख्य सल्लागार डॉ. फाऊची यांनी ‘कोरोना विषाणू प्रबळ होत असून लोकांना अनिश्‍चित काळासाठी प्रतिवर्षी कोरोनाची लस घ्यावी लागेल’, असे म्हटले आहे. ‘लोकांना नियमित रूपाने वर्षातून एकदा जसे ‘फ्ल्यू’चे इंजेक्शन दिले जाते, तसेच कोरोनाची लसही द्यावी लागेल’, अशी शक्यता फाऊची यांनी व्यक्त केली.

कोरोनाविरोधी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना ‘बूस्टर’ डोस द्यायची आवश्यका आहे का, असे विचारल्यावर डॉ. फाऊची म्हणाले की, मला याविषयी काहीच कल्पना नाही. संशोधन चालू  ठेवणे हाच यावरील पर्याय आहे. तरीही रोगप्रतिकार शक्ती अल्प असलेल्या नागरिकांना हा बुस्टर डोस दिला जाईल. सध्यातरी बुस्टर डोस देण्याची आवश्यकता आम्हाला वाटत नाही.