अशी वक्तव्ये करत बसण्यापेक्षा संयुक्त राष्ट्रे तालिबानचा निःपात करण्यासाठी प्रयत्न का करत नाही ?
न्यूयॉर्क (अमेरिका) – संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी तालिबानला त्वरित आक्रमण थांबवण्याचे आणि अफगाणिस्तानमधील लोकांच्या हितासाठी एकमेकांवर विश्वास ठेवून वाटाघाटी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच ‘शस्त्रांद्वारे सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करणे भरटकण्यासारखे आहे. यामुळे दीर्घ काळासाठी अंतर्गत युद्ध होऊ शकते आणि अफगाणिस्तान पूर्णपणे अलिप्त होण्याची भीती आहे. अफगाणिस्तान आणि तालिबानचे प्रतिनिधी यांच्यात दोहामध्ये झालेल्या चर्चेमुळे वाटाघाटीविषयी काहीतरी मार्ग निघेल, अशी आशा गुटेरेस यांनी वर्तवली. गुटेरस म्हणाले की, युद्धाच्या काळात निष्पाप नागरिकांवर आक्रमण करणे हे आंतरराष्ट्रीय मानवाधिकारांचे उल्लंघन आहे.
UN Secretary-General @antonioguterres has called on the #Taliban to immediately halt the offensive.#Afghanistan #News #UnitedNations https://t.co/gXrb4jyJG1
— IndiaToday (@IndiaToday) August 14, 2021