फाळणीच्या वेळी महंमद अली जिना यांच्या ‘डायरेक्ट अॅक्शन’मध्ये (थेट कारवाईमध्ये) मारल्या गेलेल्या हिंदूंना प्रतिवर्षी भारत सरकारने श्रद्धांजली देऊन त्यांची आठवण काढली पाहिजे ! – संपादक

नवी देहली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी वेदना स्मृतीदिन’ (विभाजन विभीषिका स्मृति दिवस) म्हणून ओळखला जाईल, असे घोषित केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्वीट करून म्हणाले की, देशाच्या फाळणीच्या वेदना विसरल्या जाऊ शकत नाहीत. द्वेष आणि हिंसाचार यांमुळे आपल्या लाखो बंधू-भगिनींना स्थलांतरित व्हावे लागले आणि काहींना तर त्यांचा जीवही गमवावा लागला. त्या लोकांच्या संघर्ष आणि बलीदान यांची आठवण ठेवत १४ ऑगस्टला ‘फाळणी वेदना स्मृतीदिन’ म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला आहे. हा दिवस आपल्याला भेदभाव, शत्रूत्व आणि द्वेष संपवण्यासाठी केवळ प्रेरणा देणार नाही; तर यामुळे एकता आणि सामाजिक सद्भावना भक्कम होतील.
#PartitionHorrorsRemembranceDay का यह दिन हमें भेदभाव, वैमनस्य और दुर्भावना के जहर को खत्म करने के लिए न केवल प्रेरित करेगा, बल्कि इससे एकता, सामाजिक सद्भाव और मानवीय संवेदनाएं भी मजबूत होंगी।
— Narendra Modi (@narendramodi) August 14, 2021
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !
‘माऊली-माऊली’च्या भक्तीमय जयघोषात माळशिरस तालुक्यातील ठाकुरबुवा समाधी येथे पार पडले माऊलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण !