संभाजीनगर जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’ रोगामुळे ५७ जणांचा मृत्यू !

जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’चे एकूण ६०८ रुग्ण आढळले आहेत. यातील ३४५ रुग्ण उपचार घेत असून २०६ जण बरे होऊन घरी परतले आहेत, तर ५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

माझी लढाई अ‍ॅलोपॅथीमधील माफियांच्या विरोधात ! – योगऋषी रामदेवबाबा

मी अ‍ॅलोपॅथी आणि डॉक्टर यांच्या विरोधात नाही. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या विरोधात जाण्याचा प्रश्‍नच येत नाही; मात्र आमचा या क्षेत्रातील  माफियांना विरोध आहे. ते २ रुपयांचे औषध २ सहस्र रुपयांना विकत आहेत.

निधन वृत्त

विश्रामबाग येथील ‘सनातन प्रभात’च्या वाचक आणि हितचिंतक  सुस्मिता दिलीप इनामदार (वय ५१ वर्षे) यांचे ३१ मे या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. सनातन परिवार इनामदार आणि पुजारी कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.

कोरोनामुक्त व्यक्तींनी पुढील ६ आठवडे कोणतेही शस्त्रकर्म करू नये ! – तज्ञांचा सल्ला

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि नॅशनल टास्क फोर्स फॉर कोविड-१९ च्या तज्ञांनी कोरोनातून मुक्त झालेल्या व्यक्तींना पुढील ६ आठवडे कोणतेही शस्त्रकर्म न करण्याचा सल्ला दिला आहे.

पुणे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये समन्वय नसल्याने वारंवार रस्त्यांची खोदाई !

महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांच्या करातून जमा झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा होत असलेला अपव्यय भरून देण्याचे दायित्व कोण घेणार ?

९८ टक्के मुसलमान असणार्‍या लक्षद्वीपमध्ये ११ वर्षांपासून म. गांधी यांचा पुतळा स्थापन करण्याचे काम प्रलंबित !

भारतीय न्यायव्यवस्थेला समांतर अशी शरीयत न्यायव्यवस्था मानणारे धर्मांध ! ९८ टक्के अल्पसंख्यांकांची लोकवस्ती असणारे लक्षद्वीप बेट उद्या भारतापासून वेगळे झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

पुण्यात जुगार खेळणार्‍या २ माजी नगरसेवकांसहित १९ जणांना अटक

अशा लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यकाळात समाजाला काय दिशा दिली असेल, याचा विचारच न केलेला बरा ! ही अनैतिकतेची कीड मुळापासून नष्ट करण्यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे, तसेच कायद्याचा धाक निर्माण करणे आवश्यक आहे !

विद्युत् कर्मचार्‍यांनी ‘तौक्ते’ चक्रीवादळात केलेले काम कौतुकास्पद ! – सौ. संजना सावंत, अध्यक्षा, जिल्हा परिषद

चक्रीवादळात हानी झालेल्या नागरिकांना पत्रे आणि ताडपत्री यांचे वाटप करण्यात आले.

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दुरुस्तीच्या कामाला निधी अल्प पडू देणार नाही ! – छत्रपती संभाजी राजे, खासदार, भाजप

छत्रपती संभाजी राजे यांनी पदाच्या त्यागपत्राचे वृत्त फेटाळले

केपे येथे ६ वर्षीय मुलीवर बलात्कार : २२ वर्षीय आरोपी ओंकार लोटुलकर पोलिसांच्या कह्यात

अशा नराधमांना त्वरित आणि कठोर शिक्षा झाल्यासच अशा प्रकारांना काही प्रमाणात तरी आळा बसेल.