९८ टक्के मुसलमान असणार्‍या लक्षद्वीपमध्ये ११ वर्षांपासून म. गांधी यांचा पुतळा स्थापन करण्याचे काम प्रलंबित !

  • पुतळा स्थापन करणे शरीयतचे उल्लंघन असल्याने विरोध !

  • गोहत्याबंदीसही विरोध

  • म. गांधी यांनी आजन्म मुसलमानांचे लांगूलचालन केले. त्यांच्यासाठी भारताच्या फाळणीला मान्यता देऊन स्वतंत्र पाकिस्तान देश निर्माण केला. तरीही त्यांना मुसलमानांकडून कोणताही सन्मान पूर्वी मिळाला नाही आणि आताही मिळत नाही, हेच ही घटना सांगते ! याविषयी तथाकथित गांधीवादी, निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • भारतीय न्यायव्यवस्थेला समांतर अशी शरीयत न्यायव्यवस्था मानणारे धर्मांध ! ९८ टक्के अल्पसंख्यांकांची लोकवस्ती असणारे लक्षद्वीप बेट उद्या भारतापासून वेगळे झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

कवरत्ती (लक्षद्वीप) – भारताचे केंद्र शासित प्रदेश लक्षद्वीप येथील नवीन प्रशासक प्रफुल्ल पटेल यांनी येथे गोहत्याबंदी केली आहे. तसेच पंचायत निवडणूक लढवण्यासाठी दोन मुलेच असणारा नियम, तसेच पर्यटन व्यवसाय वाढवण्यासाठी मद्यबंदी उठवण्याचा आदेश दिला आहे. याला स्थानिक नागरिकांकडून प्रचंड विरोध केला जात आहे. लक्षद्वीपच्या लोकसंख्येमध्ये ९८ टक्के लोक मुसलमान आहेत. त्यामुळे त्यांनी याला विरोध केला आहे. या विरोधाला काँग्रेसनेही समर्थन दिले आहे. काँग्रेसने केरळ उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करून वरील नियम रहित करण्याची मागणी केली होती; मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली होती. ११ वर्षांपूर्वी काँग्रेसने येथे म. गांधी यांचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न केला होता; मात्र मुसलमानांच्या प्रखर विरोधामुळे तो गुंडाळून ठेवण्यात आला. मुसलमानांचे म्हणणे होते की, पुतळा इस्लाममध्ये हराम आहे. प्रशासनाने मात्र मुसलमानांच्या विरोधामुळे पुतळा बसवण्यात आला नाही, असे सांगण्याचे टाळले होते. (याविषयी काँग्रेसवाले गप्प का आहेत कि गांधी यांच्यापेक्षा मुसलमान अधिक महत्त्वाचे आहेत, असे त्यांना वाटते ? – संपादक)
केरळमधील प्रसारमाध्यमांच्या वृत्तात त्या वेळी म्हटले होते की, जर येथे म. गांधी यांचा पुतळा बसवण्यात आला, तर त्याचा मान राखण्यासाठी फुलांनी नेहमी सजवावे लागेल आणि हे शरीयतचे उल्लंघन असणार आहे. त्यामुळे मुसलमानांनी याला विरोध केला.