संभाजीनगर – जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’चे एकूण ६०८ रुग्ण आढळले आहेत. यातील ३४५ रुग्ण उपचार घेत असून २०६ जण बरे होऊन घरी परतले आहेत, तर ५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णांना आवश्यक उपचारासाठी लागणार्या ‘इंजेक्शन’च्या फेरवाटपाविषयी आरोग्य विभागाच्या आयुक्तांशी चर्चा झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
शहरातून ४०० विद्यार्थी परदेशी शिक्षणासाठी जाणार असून त्यांचे लसीकरण लवकरच पूर्ण केले जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी दिली. आमदार अतुल सावे यांनी परदेशी शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थ्यांचे त्वरित लसीकरण करण्याची मागणी केली होती. ‘म्युकरमायकोसिस इंजेक्शन’च्या वितरणासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली.