शिवस्वराज्य दिनाच्या पार्श्वभूमीवर करवीर शिवसेनेकडून उंचगाव ग्रामपंचायतीस शिवराज्याभिषेक सोहळ्याचे छायाचित्र प्रदान

या वेळी करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, सर्वश्री दिपक पाटील, बाळासाहेब नलवडे, प्रफुल्ल घोरपडे, युवासेनेचे सचिन नागटीळक उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड येथे युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून धर्मांधांकडून सामूहिक बलात्कार

सामूहिक बलात्कार करणार्‍या आरबाज खान, सुलतान उपाख्य मुश्ताक सय्यद, रियाज उपाख्य मन्नन खान आणि सोहेल शेरअली पिरजादे या धर्मांधांना अटक करण्यात आली आहे.

नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी प्रतिदिन घरामध्ये हवन करा ! – खासदार आणि अभिनेत्री हेमामालिनी

भाजपच्या खासदार आणि प्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी यांनी कोरोनाला पराजित करण्यासाठी प्रतिदिन घरामध्ये हवन करण्याचे आवाहन केले आहे. हवनामुळे नकारात्मक शक्ती दूर होते, असा दावा त्यांनी केला आहे.

गुजरातमध्ये १५ जूनपासून ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा होणार लागू

गुजरात सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात संमत केलेला लव्ह जिहादविरोधी कायदा राज्यपाल आचार्य देवव्रत यांनीही संमत केला आहे. हा कायदा राज्यात १५ जूनपासून लागू होणार आहे.

पुत्तुरू (कर्नाटक) येथे ५८ वर्षांच्या धर्मांधाकडून दुकानात घुसून तरुणीचा विनयभंग

अशा वासनांध धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार हात, पाय तोडण्याच्या किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याच्या शिक्षेची कुणी मागणी केल्यास आश्‍चर्य वाटू नये !

नियमावलीची कार्यवाही न केल्यास परिणामांना सिद्ध रहा ! : केंद्र सरकारची ट्विटरला शेवटची चेतावणी

केंद्र सरकारने ‘ट्विटर’सह ‘फेसबूक’ आणि अन्य विदेशी सामाजिक माध्यमांच्या मनमानीपणाच्या अन् आडमुठेपणाच्या विरोधात कृती करून त्यांना सुतासारखे सरळ केले पाहिजे, असेच हिंदूंना आणि त्यांच्या संघटनांना वाटते !

ट्विटरकडून भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या खात्यावरील हटवलेली ‘ब्लू टिक’ पुन्हा बहाल !

ज्या प्रमाणे विरोधानंतर ट्विटरकडून ‘ब्लू टिक’ बहाल केली जाते, तसेच हिंदूंच्या संघटनांची फेसबूक पाने बंद करणार्‍या फेसबूकच्या विरोधातही हिंदूंनी आवाज उठवून त्यांच्यावर दबाव निर्माण करून ती पाने पुन्हा चालू करण्यास फेसबूकला बाध्य केले पाहिजे !

अल् कायदाचे कट्टर आतंकवादी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर लपले आहेत ! – संयुक्त राष्ट्रे

संयुक्त राष्ट्रांच्या आतंकवादविरोधी यंत्रणेच्या अहवालामध्ये म्हटले आहे की, अल् कायदाचे बहुतेक कट्टर आतंकवादी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्या सीमेवरील भागात लपले आहेत.

फेसबूककडून आता हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदी’ पानही बंद !

फेसबूकचा हिंदुद्वेष पहाता उद्या त्याने सर्वच हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि नेते यांची पाने बंद केली, तर आश्‍चर्य वाटू नये ! हिंदु जनजागृती समिती आज जात्यात आणि अन्य सुपात असल्यामुळे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी संघटित होऊन फेसबूकचा वैध मार्गाने प्रखर विरोध केला पाहिजे !

संभाजीनगर येथे कोरोनाच्या संकटकाळात उद्योग संघटनांनी केलेल्या कार्याची केंद्रशासनाच्या नीती आयोगाकडून नोंद !

कोरोना साथरोगाची दाहकता लक्षात घेऊन शहरातील उद्योजकांच्या संघटनांनी ‘टीम ऑफ इंडस्ट्रीज असोसिएशन’ असा एक समूह सिद्ध करून वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ केली.