|
|
मुंबई – फेसबूककडून हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदु अधिवेशन’, तसेच ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे ‘सनातन प्रभात’ आणि सनातनचे ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादनांची विक्री करणारे ‘सनातन शॉप’ ही फेसबूक पाने बंद करण्यात आल्यानंतर या संदर्भात हिंदु जनजागृती समिती, सनातन प्रभात आणि सनातन संस्था यांच्याकडून पत्रे पाठवण्यात आली आहेत; मात्र याविषयी फेसबूककडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. हे कमी म्हणून की काय आता फेसबूकने समितीचे हिंदी पानही बंद केले आहे. तसेच अमेरिकेतील हिंदुत्वनिष्ठ संघटना ‘फोरम फॉर हिंदू अवेकनिंग’ (एफ्.एच्.ए.) या हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे पानही बंद केले आहे. अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी फेसबूकच्या या हिंदुद्वेषी भूमिकेचा वैध मार्गाने निषेध नोंदवत आहेत.
हिंदु अधिवेशन, समितीचे हिंदी पान, एफ्.एच्.ए., सनातन प्रभात आणि सनातन शॉप यांच्यावरील बंदीमुळे भारतभरातील, तसेच विदेशातील लक्षावधी राष्ट्रप्रेमी अन् धर्मप्रेमी यांची झालेली हानी !
१. ‘हिंदु अधिवेशन’ या फेसबूक पानाची सदस्य संख्या १४ लाख ४५ सहस्र इतकी होती. हे पान ‘व्हेरिफाईड पेज’ (संघटनेचे अधिकृत मान्यता असेलेले पेज) होते. याशिवाय समितीची राज्य आणि जिल्हास्तरीय पानेही कार्यरत आहेत. यांपैकी बहुतांश पाने म्हणजे ३५ राज्य आणि जिल्हास्तरीय पानेही फेसबूकने आता बंद केली आहेत. या सर्व पानांवरून राष्ट्र आणि धर्म यांविषयीच्या घडामोडी, तसेच धर्मशिक्षणाच्या नियमित पोस्ट्स करण्यात येत होत्या. या सर्व पोस्ट कायद्याच्या चौकटीतच करण्यात येत असल्याचे मत समितीने मांडले आहे. या पानांवरून राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांना दिशादर्शन करण्यात येत होते. ते बंद झाल्याने राष्ट्र आणि धर्म यांसंदर्भातील पैशांमध्ये गणना करता न येण्याइतकी हिंदूंची वैचारिक हानी झाली आहे.
२. हिंदु जनजागृती समितीच्या हिंदी पानाची सदस्य संख्या २ लाख ५० सहस्रांहून अधिक होती. या पानांवरूनही राष्ट्र आणि धर्म यांविषयीची माहिती हिंदूंना दिली जात असे.
३. अमेरिकेतील हिंदुत्वनिष्ठ संघटना फोरम फॉर हिंदू अवेकनिंग (एफ्.एच्.ए.) च्या पानाची ६ लाखांहून अधिक सदस्य संख्या होती. यातून हिंदूंना धर्म आणि साधना यांविषयीची माहिती दिली जात असे. धर्मासाठी कृतीशील होण्यासाठी दिशादर्शन केले जात असत. विशेषत: अमेरिका आणि अन्य देशांतील हिंदूंना यावरून मार्गदर्शन केले जात होते.
४. सनातन प्रभात नियतकालिकांतून हिंदूंना राष्ट्र आणि धर्म यांसह साधनेविषयी मार्गदर्शन करण्यात येत होते. ‘सनातन प्रभात’च्या फेसबूक पेजची ७ सहस्र ५०० हून अधिक सदस्य संख्या होती. या पानावरून राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात, तसेच धर्मशिक्षण आणि संतांचे विचार आदींचा नियमितपणे प्रसार केला जात होता. तेही बंद झाल्याने हिंदूंना राष्ट्र आणि धर्म यांविषयीची माहिती मिळेनाशी झाली आहे. याला फेसबूक उत्तरदायी आहे. (फेसबूकचा हा मनमानी कारभार म्हणजे पत्रकारितेची नि अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपीच होय ! – संपादक)
५. ‘सनातन शॉप’च्या पानाची सदस्य संख्या ५ सहस्र ६०० इतकी होती. या पानावरून५ सनातनच्या विविध विषयांवरील ग्रंथांच्या संदर्भातील पोस्ट करण्यात येत असत. यांत आयुर्वेद, अध्यात्म, साधना, आपत्काळ, सण-धार्मिक उत्सव, बालसंस्कार इत्यादी विषयांचा समावेश होता.
फेसबूकने बंद केलेली हिंदुत्वनिष्ठ नेते आणि संघटना यांची पाने !
वर्ष २०१२ मध्येही हिंदु जनजागृती समितीचे अधिकृत ‘पेज’ कोणतेही कारण न देता बंद करण्यात आले होते. प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि भाजपचे आमदार टी. राजासिंह यांचे अधिकृत फेसबूक पानही कोणतेही कारण न देता फेसूबकने बंद केले होते. तसेच सनातन संस्थेच्या अधिकृत पानावरही गेल्या वर्षी अशाप्रकारेच अन्याय्य बंदी लादण्यात आली. एवढेच नव्हे, तर संस्थेच्या संकेतस्थळाची कोणतीही मार्गिका कुणीही फेसबूकवर पोस्टही करू शकत नाही. हिंदुत्वनिष्ठ संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांच्या ‘सुदर्शन न्यूज’चे, तसेच ‘ऑप इंडिया’ या राष्ट्रवादी आणि हिंदुत्वनिष्ठ ‘न्यूज पोर्टल’ यांचे ‘फेसबूक पेज’ही काही कालावधीपूर्वी बंद करण्यात आले आहे.
फेसबूकचा हिंदुद्वेष्टा दुटप्पीपणा !
|
याचा अर्थ हिंदूंनी काय घ्यायचा ? समाजामध्ये विद्वेष आणि हिंसक विचार पसरवणारे, तशी प्रत्यक्ष कृती करणारे यांच्याविषयी फेसबूकला उमाळा आहे, असे समजायचे का ? ही पाने बंद न करण्याविषयी आणि हिंदु जनजागृती समिती, सनातन प्रभात आदींची पाने बंद करण्याविषयीची कारणे फेसबूकने जनतेला द्यायला हवी अथवा केंद्रशासनाने हिंदूंवरील या अन्याय्य कारवाईवर फेसबूकला उत्तर देण्यास भाग पाडले पहिजे.
जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय), रझा अकादमी, जिहादी आतंकवाद्यांचा आदर्श असणारा आणि भारतातून पसार झालेला डॉ. झाकीर नाईक यांची फेसबूक पाने अद्यापही अव्याहतपणे चालू आहेत. डॉ. झाकीर यांच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेवर तर बंदीच घालण्यात आली आहे. इतकेच नव्हे, तर झाकीर नाईक यांची एक नव्हे, तर ४ फेसबूक पाने आहेत. त्याचे लाखो लोक फॉलोअर्स आहेत. तसेच हिंदु धर्मातील रूढी, परंपरा, श्रद्धा यांचे भंजन करण्याचा विडा उचलणार्या आणि नक्षलवाद्यांशी संबंध असणार्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चेही फेसबूक पान चालू आहे.
एवढेच नव्हे, तर हिंदुद्वेष्ट्या आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या बेंगळुरू येथील पत्रकार गौरी लंकेश यांच्या स्मरणार्थ चालू करण्यात आलेल्या फेसबूक पानावरही फेसबूकने जुलै २०२० मध्ये बंदी आणली होती. याचा साम्यवादी आणि कथित धर्मनिरपेक्षतावादी यांनी विरोध केल्यावर त्याची त्वरित दखल घेत ते पान चालू करण्यात आले. तसेच फेसबूकच्या प्रतिनिधीने ‘आम्ही या चुकीसाठी क्षमा मागतो’, असे स्पष्टीकरणही दिले होते.
हिंदुत्वनिष्ठ आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांना आवाहन !फेसबूकची हिंदुद्वेष्टी वागणूक ज्या पद्धतीने सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी अनुभवली आहे, त्याच प्रकारे अन्यांनीही अनुभवली असेल. समाजामध्ये नि:स्वार्थपणे राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी अविरतपणे कार्य करणार्या अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या फेसबूक पानांवरही बंदी लादण्यात आली असेल. या अनुषंगाने हिंदु जनजागृती समितीने सर्व हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मासाठी कार्य करणार्या संघटनांना आवाहन केले आहे की, अशाप्रकारे फेसबूकने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता त्यांच्या पानांवर बंदी आणली असेल, तर याची माहिती हिंदु जनजागृती समितीला कळवा. यासंदर्भात समिती नक्कीच आपले साहाय्य करील. माहिती पाठवतांना संघटनेचे नाव, फेसबूक पानाची लिंक (मार्गिका), सदस्य संख्या आणि संपर्क क्रमांक यांचा समावेश करावा. हिंदु जनजागृती समितीला पुढील संपर्कांवर संपर्क करू शकता : इ-मेल पत्ता : [email protected] संपर्क क्रमांक : ९३२२५३३५९५ |