शिवस्वराज्य दिनाच्या पार्श्वभूमीवर करवीर शिवसेनेकडून उंचगाव ग्रामपंचायतीस शिवराज्याभिषेक सोहळ्याचे छायाचित्र प्रदान

उंचगाव ग्रामपंचायतीत शिवराज्याभिषेक सोहळ्याचे छायाचित्र प्रदान करतांना राजू यादव (उजवीकडून दुसरे) , तसेच अन्य

उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) – महाराष्ट्र सरकारने ६ जून हा शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर करवीर शिवसेनेच्या वतीने उंचगाव ग्रामपंचायतीस ५ जून या दिवशी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे छायाचित्र ग्रामविकास अधिकारी श्री. अजित राणे आणि तलाठी महेश सूर्यवंशी यांना देण्यात आले. अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांसह शासकीय-निमशासकीय कार्यालये, सामाजिक संस्था यांना हे छायाचित्र हवे असेल, तर आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी केले आहे. या वेळी करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, सर्वश्री दिपक पाटील, बाळासाहेब नलवडे, प्रफुल्ल घोरपडे, युवासेनेचे सचिन नागटीळक उपस्थित होते.