सनातनची सर्वांगस्पर्शी आध्यात्मिक ग्रंथसंपदा सर्व भारतीय आणि विदेशी भाषांमध्ये प्रकाशित व्हावी, यासाठी ग्रंथनिर्मितीच्या व्यापक सेवेत सहभागी व्हा !

आपली आवड आणि क्षमता यांनुसार लिखाणाचे संकलन, संरचना आणि विविध भाषांत भाषांतर करणे इत्यादी ग्रंथनिर्मितीच्या कार्यात आपण हातभार लावू शकता.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी साधनेविषयी केलेले अमूल्य मार्गदर्शन !

‘कुठे आजची मुले, तर कुठे वयाच्या ११ व्या वर्षी आत्मज्योतिज्ञान प्राप्त करणारे शंकराचार्य !’

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात स्थापना करण्यात आलेल्या धर्मध्वजाचे सौ. योया वाले यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण

सप्तर्षींच्या आज्ञेने अक्षय्य तृतीयेच्या शुभदिनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या शुभहस्ते धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली.

प्रारब्ध

अध्यात्मविषयक प्रश्नोत्तराच्या माध्यमातून पू. अनंत आठवले यांनी सोप्या भाषेत उलगडलेले ज्ञान येथे देत आहोत. यातून वाचकांना अध्यात्मातील तात्त्विक विषयाचे ज्ञान होऊन त्यांच्या शंकांचे निरसन होईल आणि ते साधना करण्यास प्रवृत्त होतील.

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी कुटुंबाविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

जगात मोठा भाऊ गरीब का असतो ? सर्व भावांचे विवाह करवून देत राहिल्याने तो कर्जबाजारी होतो. बाकी भाऊ बायका घेऊन वेगळे राहू लागतात; कारण ते स्वार्थी असतात. मोठा भाऊ कर्जाचा मालक होतो; कारण तो निःस्वार्थी असतो.’

गुरुपौर्णिमेला ४७ दिवस शिल्लक

कृपा हा शब्द कृप् या धातूपासून तयार होतो. कृप् म्हणजे दया करणे आणि कृपा म्हणजे दया, करुणा, अनुग्रह किंवा प्रसाद. गुरुकृपेच्या माध्यमातून जीव शिवाशी जोडला जाणे, याला गुरुकृपायोग असे म्हणतात. 

देहली न्यायालयाची आय.एम्.ए.चे अध्यक्ष जॉनरोज ऑस्टिन जयलाल यांना तंबी !

जे न्यायालयाने सांगितले, ते आय.एम्.ए.च्या एकाही सदस्याने त्यांच्या अध्यक्षांना का सांगितले नाही ? कि त्यांना डॉ. जयलाल यांचे विधान मान्य होते ?

उज्जैन येथील श्री महाकाल मंदिराच्या खाली आढळल्या जुन्या मूर्ती आणि भिंती !

या मूर्ती आणि भिंती या ११ व्या किंवा १२ व्या शतकातील असल्याचे पुरातत्व विभागातील तज्ञांचे मत आहे. खोदकामाच्या वेळी अन्यही ऐतिहासिक वस्तू आढळतील, अशी आशा पुरातत्व विभागाने व्यक्त केली आहे.

कोणत्याही धर्माचा प्रसार करतांना इतर धर्मांची विटंबना करण्याचे अधिकार कोणत्याही धर्माला नाहीत ! – कर्नाटक उच्च न्यायालय

धर्माच्या अप्रतिष्ठेचा आरोप करणारी फौजदारी तक्रार रहित करण्याची आरोपींनी केलेली मागणी फेटाळून लावतांना त्यांनी हे वक्तव्य केले.

पायी वारीविषयी निर्णय घेण्यासाठी शासकीय अधिकारी आणि वारकरी प्रतिनिधी यांची समिती गठीत

ही समिती सर्व वारकरी प्रतिनिधींशी चर्चा करून पायी वारीविषयी आपला अहवाल शासनाकडे सादर करणार आहे. त्यानंतर निर्णय घेण्यात येणार आहे.