गुजरातमध्ये १५ जूनपासून ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा होणार लागू

दोषी धर्मांधांना होणार १० वर्षांची शिक्षा !

कर्णावती (गुजरात) – गुजरात सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात संमत केलेला लव्ह जिहादविरोधी कायदा राज्यपाल आचार्य देवव्रत यांनीही संमत केला आहे. हा कायदा राज्यात १५ जूनपासून लागू होणार आहे. या कायद्यामुळे बलपूर्वक, आमिष दाखवून किंवा विवाहाच्या माध्यमातून धर्मपरिवर्तन करण्यास भाग पाडले, तर गुन्हा असणार आहे. या कायद्यांतर्गत दोषी आढळल्यास आरोपीला १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. धर्म लपवून विवाह केल्यास ५ वर्षांची शिक्षा आणि २ लाख रुपयांंचा दंड असणार आहे. तसेच अल्पवयीन मुलीशी विवाह केल्यास ७ वर्षांचा कारावास आणि ३ लाख रुपयांचा दंड करण्याची तरतूद या कायद्यात आहे.