पिंपरी-चिंचवड येथे युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून धर्मांधांकडून सामूहिक बलात्कार

४ धर्मांधांना अटक, २ अल्पवयीन धर्मांध पसार

वासनांध धर्मांध ! अशांना कठोर शिक्षाच व्हायला हवी !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पिंपरी-चिंचवड – युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून युवतीचे अश्लील चित्रीकरण करून ते प्रसारित करण्याची धमकी देत ४ धर्मांध आणि अन्य अल्पवयीन धर्मांधांनी युवतीवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेमुळे वासनांध धर्मांधांच्या मानसिकतेचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. सामूहिक बलात्कार करणार्‍या आरबाज खान, सुलतान उपाख्य मुश्ताक सय्यद, रियाज उपाख्य मन्नन खान आणि सोहेल शेरअली पिरजादे या धर्मांधांना अटक करण्यात आली आहे. घटनेतील २ अल्पवयीन धर्मांध पसार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. धर्मांधांनी युवतीचे केलेले अश्लील चित्रीकरण इतर आरोपींना आणि अल्पवयीन मुलांना पाठवल्याने त्यांनीही पीडित युवतीला धमकावत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले आहे.