राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अपकीर्ती करणारा ‘मुंबई सागा’ चित्रपटातील आक्षेपार्ह भाग अस्पष्ट केला !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अपकीर्ती करणारा ‘मुंबई सागा’ या चित्रपटातील आक्षेपार्ह भाग अस्पष्ट केल्याची माहिती केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने २४ जून या दिवशी पत्राद्वारे अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर यांना कळवली आहे.

उत्तरप्रदेशातील हिंदूंच्या धर्मांतरप्रकरणी बीड जिल्ह्यातील इरफान शेखला उत्तरप्रदेश पोलिसांकडून अटक

उत्तरप्रदेश येथील अवैध धर्मांतरप्रकरणाचा बीड शहराशी असलेला संबंध समोर आला आहे. धर्मांतरप्रकरणी बीड जिल्ह्यातील इरफान शेख याला उत्तरप्रदेश पोलिसांनी अटक केली आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी ४ फूट, तर घरगुती उत्सवासाठी २ फूट गणेशमूर्तीची मर्यादा

कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करण्यावर निर्बंध असले, तरी श्रद्धा-भक्ती यांवर निर्बंध असू शकत नाहीत ! कोरोनाचे विघ्न दूर होऊन  गणेशाची कृपा होण्यासाठी भक्तीभावाने गणेशोत्सव साजरा करूया !

जळगाव येथील भुईकोट किल्ल्याविषयी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राबवलेली मोहीम !

मुंबईमध्ये राष्ट्र आणि धर्म प्रेमी नागरिकांनी ‘ट्वीट्स’ करून या ‘ऑनलाईन’ आंदोलनात सहभाग घेतला. राष्ट्रप्रेमींनी ‘प्लाकार्ड’द्वारे या आंदोलनात सहभाग घेऊन किल्ल्याकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची, तसेच किल्ल्याचे संवर्धन करण्याची मागणी केली.

हिंगोली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचा फज्जा !

राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या दौर्‍याच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाचे नियम पायदळी तोडवून कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यामध्ये बरेच कार्यकर्ते विनामास्क आढळून आले होते. त्यामुळे येथे कोरोना नियमांचा फज्जा उडाला.

‘ट्विटर’ची विकृती !

आज मानचित्रात १-२ भूभाग वगळले, उद्या देशाचेच अस्तित्व मिटवण्याचाही प्रयत्न होऊ शकतो. असे होऊ नये, यासाठी ट्विटरची ही विकृती वेळीच नष्ट करायला हवी, हाच पर्याय आहे.

सनातनचे साधक आणि नाक-कान-घसा तज्ञ आधुनिक वैद्य नितीन कोठावळे यांचे निधन : नवे पारगाव परिसरावर शोककळा

सनातन संस्थेचे साधक आणि नाक-कान-घसा तज्ञ आधुनिक वैद्य नितीन प्रभाकर कोठावळे (वय ५९ वर्षे) यांचे २९ जून या दिवशी दीर्घ आजाराने दुपारी १२.१५ वाजता त्यांच्या रहात्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आधुनिक वैद्य कौशल, दोन भाऊ, दोन भावजया, एक पुतण्या आणि एक पुतणी असा परिवार आहे.

पाकला ‘आतंकवादी देश’ घोषित करा !

तालिबानी आतंकवाद्यांची कुटुंबे इस्लामाबादमध्येच रहातात, तसेच तालिबानी आतंकवाद्यांवर पाकिस्तानी रुग्णालयांत उपचारही केले जातात, अशी स्वीकृती पाकचे मंत्री शेख रशिद अहमद यांनी दिली आहे.