हिंगोली येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचा फज्जा !

‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण’, अशा पद्धतीने कोरोना प्रतिबंधात्मक नियमांविषयी वागणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री !

मध्यभागी जयंत पाटील

हिंगोली – राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या दौर्‍याच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाचे नियम पायदळी तोडवून कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यामध्ये बरेच कार्यकर्ते विनामास्क आढळून आले होते. त्यामुळे येथे कोरोना नियमांचा फज्जा उडाला.

कार्यकर्त्यांनी ‘क्रेन’द्वारे हार बनवून नांदेड नाका येथे पाटील यांच्या स्वागताची सिद्धता केली; मात्र पाटील यांनी स्वागत नाकारल्याने कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला. दौर्‍यात जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांसमवेत ‘संवाद’ बैठक घेतली. बैठकीच्या वेळी पुष्कळ गर्दी झाली होती.