मुख्याधिकार्‍यांशी उद्धटपणे बोलणारे नगरसेवक एरव्ही कसे बोलत असतील ?

(प्रतिकात्मक छायाचित्र)

‘मालवण शहरातील गटारांची स्वच्छता न केल्याने १४.६.२०२१ या दिवशी पडलेल्या मुसळधार पावसामुळे बाजारपेठेत पाणी तुंबले होते. त्यामुळे १५.६.२०२१ या दिवशी उपनगराध्यक्ष राजन वराडकर आणि अन्य नगरसेवक यांनी मुख्याधिकार्‍यांच्या दालनात धडक देत त्यांना उद्धटपणे खडसावले, तसेच शहरातील गटारांची तात्काळ पहाणी करण्यासाठी मुख्याधिकार्‍यांना बोलावले. यावरून नगरसेवक आणि मुख्याधिकारी यांच्यात बाचाबाची झाली. त्यामुळे मुख्याधिकार्‍यांनी पोलिसांना पाचारण केले.