घरोघरी आयुर्वेद

कोणते पेय कधी घ्यावे ?

वैद्य परीक्षित शेवडे
  • जव, गहू, दही, मध यांच्या सेवनानंतर किंवा मद्य, विष यांचे सेवन झाल्यास थंड पाणी प्यावे.
  • नेहमी आंबवलेले पदार्थ खाल्ल्यावर गरम पाणी प्यावे.
  • भाज्या, मूगाची उसळ वा भजी, वडे खाल्ल्यावर दह्याची निवळी, ताक किंवा कांजी प्यावी.
  • स्थौल्यात (स्थुलपणा) मध + खोलीच्या तापमानाच्या इतक्या तापमानाचे पाणी प्यावे. (खोलीचे तापमान म्हणजे तापमान ज्यात मनुष्य आरामदायी वातावरण अनुवभतो. या तापमानात व्यक्तीने सामान्य कपडे घातले असता त्याला थंड किंवा उष्ण जाणवत नाही.)
  • आजार, शस्त्रक्रिया, प्रवास, अतिभाष्य, अतीशारीरिक संबंध, लंघन, उन्हात काम करणे या गोष्टींमुळे आलेल्या थकव्यात (अपचन नसल्याची खात्री करून) देशी गायीचे दूध प्यावे.

– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पती, डोंबिवली.