डोंबिवली येथील कोविड रुग्णालयात उद्वाहन कोसळून कोरोना रुग्णासह चौघे जण घायाळ !

२३ एप्रिलच्या रात्री ९ वाजता कोरोना झालेल्या रुग्णाला रुग्णालयात भरती करून नेण्यासाठी घेऊन जातांना रुग्णालयाचे उदवाहन यंत्र (लिफ्ट) पहिल्या मजल्यावरून अचानक खाली कोसळले. यात रुग्णासह चौघेजण घायाळ झाले आहेत.

४ दिवसांत महानगरपालिका कोविड केंद्रांसह सर्व खासगी रुग्णालयांचे फायर, ऑक्सिजन आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आयुक्तांचे निर्देश

नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तातडीने संबंधित अधिकार्‍यांंची बैठक घेत महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेच्या कोविड केंद्रांसह सर्व खासगी रुग्णालयांचे फायर, ऑक्सिजन आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत

पाकिस्तानमधील हिंदूंची स्थिती !

पाकिस्तानात हिंदूंवर होणारे अत्याचार, त्यांच्या संपत्तीची  हानी, हिंदु महिलांवर होणारे बलात्कार यांमुळे अनेक हिंदू अनेक वर्षांपूर्वी भारतात आले. नागरिकत्व सुधारणा कायदा अस्तित्वात नसल्यामुळे ते अनेक सुविधांपासून वंचित आहेत.

संभाजीनगर येथील मिनी घाटी रुग्णालयातून ५ रेमडेसिविर इंजेक्शनची चोरी !

रुग्णालयाच्या शीतकपाटातून रेमडेसिविर इंजेक्शनची चोरी होते, म्हणजे रुग्णालयातीलच कुणाचातरी यात सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णालयातील सीसीटीव्ही यंत्रणा पडताळून इंजेक्शनची चोरी करणार्‍या संबंधिताला कठोर शासन होणे अपेक्षित !

श्रीरामनवमीनिमित्त हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने पार पडला ‘ऑनलाईन’ सोहळा !

कोरोनाच्या संसर्गामुळे मंदिरात न जाताही सोेहळ्याच्या निमित्ताने घरीच श्रीरामाचे अस्तित्व अनुभवल्याची अनेकांनी घेतली अनुभूती !

कोरोनाच्या काळात साहाय्य न केल्याने नागपूर येथील आमदार टेकचंद सावरकर हरवल्याची पोस्ट प्रसारित !

कोरोनाची परिस्थिती बिकट झाल्यापासून टेकचंद सावरकर मतदारसंघात फिरकले नाहीत. त्यामुळे संतप्त मतदारांनी वरील प्रकार केला, तर काहींनी त्यांचा श्रद्धांजली कार्यक्रमही केला.

शाकाहारी पदार्थ खाल्ल्याने आणि प्रतिकारशक्तीमुळे कोरोनातून बरा झालो ! – सोनू सूद, अभिनेते

मी शाकाहारी आहे. मला फळे आणि हिरव्या भाज्या खाण्याची सवय आहे. कोरोना झाल्यावर मी व्हिटॅमिन, कॅल्शियम, झिंक इत्यादी पदार्थ घ्यायचो. तसेच माझ्यातील प्रतिकारशक्तीमुळे मला कोरोनामधून बरे होण्यास साहाय्य झाले.

सातारा येथे कोरोना प्रतिबंधित लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी !

आपत्काळात सर्वांना लस वेळेत आणि कोणतीही अडचण न येता मिळावी यासाठी प्रशासनाचे नियोजन नसल्याचा हा परिणाम ! आतातरी चांगले नियोजन करून सर्वांना व्यवस्थित लस मिळावी, हे पहायला हवे.

कुंभार गल्ली (कोल्हापूर) येेथे भाजी विक्री करणार्‍या हिंदु शेतकर्‍यांना उद्दाम धर्मांधांकडून भाजी विक्रीस मज्जाव !

सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी धर्मांधांचे अतीलांगूलचालन केल्याने धर्मांध आज हिंदु शेतकर्‍यांना भाजी विक्री करण्यास मनाई करत आहेत. अशा घटना उद्या देशभर घडल्यास आश्‍चर्य वाटायला नका !

खडक पोलीस ठाणाच्या हद्दीतील पशूवधगृहातून ३ गोवंशियांची सुटका

गोवंशियांची हत्या करणार्‍यांना कठोर शिक्षा न झाल्याचा परिणाम !