मुंबई – मी शाकाहारी आहे. मला फळे आणि हिरव्या भाज्या खाण्याची सवय आहे. कोरोना झाल्यावर मी व्हिटॅमिन, कॅल्शियम, झिंक इत्यादी पदार्थ घ्यायचो. तसेच माझ्यातील प्रतिकारशक्तीमुळे मला कोरोनामधून बरे होण्यास साहाय्य झाले. मी श्वासाचे व्यायामही केले. औषधाच्या जोडीला वाफ घेतली, अशी माहिती कोरोनावर मात केलेले अभिनेते सोनू सूद यांनी एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली. सहा दिवसांत त्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
नेहमीच साहाय्य करणार्या सोनू सूद यांना रात्री-अपरात्रीही कोविड रुग्णांच्या नातेवाइकांचे दूरभाष येतात. याविषयी सांगतांना ते म्हणाले, ‘‘अनेक नातेवाईक माझ्याकडे साहाय्य मागतात. त्यांचा निराश करणारा आवाज ऐकल्यावर मी झोपू शकत नाही. आपण सर्वजण कठीण काळात जगत आहोत; पण उद्याची सकाळ नक्कीच चांगली असेल. फक्त स्वत:वरची पकड आणखी मजबूत करा. आपण एकत्र मिळून यातून बाहेर पडू. आपल्याला आणखी काही हातांची आवश्यकता आहे.’’